अखिलेश यादव

'सायकल'साठी पिता-पुत्राचा संघर्ष!

समाजवादी पार्टीतला राजकीय यादवी टोकाला गेलाय. पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हासाठी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळलाय.

Jan 3, 2017, 09:31 AM IST

लखनऊची यादवी आता दिल्ली दरबारी

समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय. 

Jan 2, 2017, 11:09 AM IST

अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.

Jan 1, 2017, 04:25 PM IST

अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द, सपातील फूट टळली

 अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द झालंय.. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.. दोघांनाही सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

Dec 31, 2016, 02:02 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा, आमदारांची मुलायम की अखिलेशला पसंती?

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या राजकारणासाठी आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. सपासाठी आजचा दिवस सुपर सॅटर्डे ठरणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या शक्तीप्रदर्शनाचा हा दिवस आहे.

Dec 31, 2016, 09:18 AM IST

उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल', काँग्रेस देणार अखिलेश यादव यांना पाठींबा

 सपातून हकालपट्टीतून केल्याला अखिलेश यादव यांना सरकार स्थापनेसाठी  काँग्रेस  पाठींबा देणार आहे. त्यामुळे सरकार वाचणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Dec 31, 2016, 08:28 AM IST

उत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात

उत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात

Dec 30, 2016, 11:23 PM IST

उत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात

  उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची ६ वर्षासाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या राजकारणाच्या आखाड्यात यादवांमध्येच दंगल सुरू झाली आहे.

Dec 30, 2016, 10:06 PM IST

उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल'... मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडलीय. शिस्तभंगाची कारवाई करत सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी चक्क आपल्या मुलाची म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच पक्षातून हकालपट्टी केलीय.  

Dec 30, 2016, 06:59 PM IST

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात पुन्हा यादवी सुरू

समाजवादी पक्षात अंतर्गत राजकारणानं कळस गाठलाय. वडील, काका आणि पुतण्या सध्या याद्यांवर याद्या जाहीर करतायत. त्यामुळं युपी विधानसभेच्या एकूण जागांपेक्षा दीडपट अधिक उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झालीयत. 

Dec 30, 2016, 02:02 PM IST

उत्तरप्रदेशात राजकीय 'यादवी', अखिलेश यांच्यानंतर शिवपाल यांची दुसरी यादी जाहीर

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून त्यांनी आपल्या २३५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता सपाने अधिकृतपणे दुसरी यादी जाहीर केली. शिवपाल यादवर यांनी ही यादी जाहीर केली आहे.

Dec 30, 2016, 09:10 AM IST

उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी', मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं बंड

उत्तर प्रदेशातला सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 

Dec 29, 2016, 09:56 PM IST

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Dec 7, 2016, 06:19 PM IST