कोयना धरण

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

Sep 20, 2017, 12:48 PM IST

कोयना धरणाचे चार दरवाजे उघडले

कोयना धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. 

Jul 30, 2017, 02:44 PM IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे.  गेल्या २४ तासात कोयणा पाणलोट क्षेत्रात ३६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासात ४६८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

Jun 26, 2017, 10:10 AM IST

कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.

May 8, 2017, 09:22 AM IST

कोयना धरणातील पाणी कर्नाटकला सोडले

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारा नुसार कोयना धरणातून प्रती सेकंद ९०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जातोय. कर्नाटकात भीषण पाणी टंचाई असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

Apr 12, 2017, 10:07 AM IST

साताऱ्यात मुसळधार, कोयने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 17, 2016, 08:56 AM IST

कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटांनी उघडले

कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटानी उचलले 

Aug 8, 2016, 01:20 PM IST

कोयना धरण निम्म भरल्याने वीज संकट टळले

आणखी एक चांगली बातमी कोयना धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे आणि सद्यस्थितीत धरणात ५० टीएमसी पाणी आहे. धरण निम्म भरल्यामुळे वीज निर्मिती आणि १८ जलसिंचन योजना पूर्ववत सुरू झाल्यात.

Jul 19, 2016, 09:56 AM IST

सातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

 साताऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, कोयना धरण परिसरात हा धक्का जाणवला आहे. 

May 18, 2016, 07:32 PM IST

कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.

Apr 25, 2012, 12:31 PM IST

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.

Apr 25, 2012, 11:28 AM IST