डेंग्यू

लग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...

 तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.

Nov 27, 2014, 07:30 PM IST

अजित पवारांनी डेंग्यूविषयी अधिकाऱ्यांना झापलं

शहरात डेंगूच्या थैमानानंतर अजित पवार यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना चांगलंच झापलं. डेंगू आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची दादांनी तंबी दिलीय, त्याच बरोबर डेंगू बाबत जनजागृती वर भर देण्याची गरज अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

Nov 16, 2014, 09:58 PM IST

सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण

गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

Nov 15, 2014, 10:35 AM IST

राज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं

राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. 

Nov 14, 2014, 08:53 PM IST

डेंग्यू हा मीडियानं मोठा केलेला आजार, महापौरांची मुक्ताफळं

मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियानं मोठा केल्याचा भ्रम झालाय. त्यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियानं मोठा केलाय, त्यामुळं मी आज इथं भेट दिली, असं त्या म्हणाल्या. 

Nov 11, 2014, 05:07 PM IST

डेंग्यूचा १२ बळी : केईएममध्ये चार महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

केईएममध्ये चार महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Nov 8, 2014, 08:55 PM IST

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

Nov 8, 2014, 08:07 PM IST

मुंबईत डेंग्यूचे १२ बळी , केईएममध्ये बालिकेचा मृत्यू

 डेंग्यूने मुंबईत १२वा बळी घेतलाय. केईएम रुग्णालयात ४ महिन्यांच्या चिमुकलीचा डेंग्युमुळे मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यातील सानिया शेख या चिमुरडीला डेंग्युमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत डेंग्यूचे एकूण १२ रुग्ण बळी पडले आहेत.

Nov 8, 2014, 10:09 AM IST