Loksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा

Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली. 

नेहा चौधरी | Updated: Apr 9, 2024, 12:15 PM IST
Loksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा title=
loksabha 2024 mva formula Sharad pawar Uddhav thackeray Nana patole formula

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघाम वाजले असताना लवकरच पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरीदेखील महा विकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद सुरु होता. या वादाला पूर्णविराम लागायचं म्हटलं जातंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युल्याची घोषणा केली. 

महाविकास आघाडीचा  21 : 10 : 17  चा फॉर्म्युला अंतिम
शिवसेना ठाकरे गट - 21
काँग्रेस - 17
राष्ट्रवादी शरद पवार गट - 10

काँग्रेस 17 जागांवर लढणार

नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, नाणेर, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

राष्ट्रवादीची यादी

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड

21 जागा उद्धव ठाकरे गट

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,  मुंबई ईशान्य

गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांचा तिढा संपुष्टात आला आहे.