भारतीय जवान

भारतीय जवान रोज पाच-सहा दहशतवाद्यांचा खात्मा करतात

रोज पाच-सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केला 

Oct 9, 2017, 09:06 AM IST

४ दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी केलं ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये सुरक्षा रक्षकांनी आणखी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असल्याचं बोललं जातंय. सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे. याआधी रविवारी सुरक्षा रक्षकांनी तीन अतिरेक्यांना ठार केले होते.

Sep 25, 2017, 05:06 PM IST

जवान छातीपर्यंत पाण्यात उभं राहून करताहेत देशाचं संरक्षण

देशाचे जवान आपल्या घरापासून दूर देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कसे दिवसरात्र डोळ्यात तेल घालून उभे असतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. काही सिनेमांमधूनही हे बघायला मिळतं. पण आता सैनिक खरंच कशा स्थितीत देशाचं रक्षण करतात हे दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. 

Aug 14, 2017, 01:11 PM IST

भारतीय जवानांनी ३ दहशवताद्यांना केलं ठार

जम्मू-कश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्यु सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सीमाभागातून घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. सुरक्षा रक्षकांनी रविवार रात्री सीमा भागाजवळ असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये काही संशयित हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करणयासाठी सांगितलं. पण दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. त्यानंतर काही तास चाललेल्या या चकमकीत ३ हदहशतवाद्यांना कंठस्नान गालण्यात आलं. अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. जवानांचं या भागाच सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jul 10, 2017, 03:43 PM IST

भारतीय जवानांचं उत्तर, पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधून एक बातमी एक आहे की, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना उत्तर देत पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानकडून फायरिंग होत असतांना त्याला भारतीय जवानांनी देखील चौख उत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तानचे २ जवानांना मारण्यात आलं.

Jun 15, 2017, 01:59 PM IST

भारतीय लष्कराची कारवाई, पाकिस्तानचे दोन बॅट कमांडो ठार

पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.

May 26, 2017, 10:07 PM IST

भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

May 1, 2017, 08:58 PM IST