मुंबई महानगरपालिका निवडणूक

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांच्यासह चार नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपमधलं गटातटाच्या राजकारणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला.

Jan 24, 2012, 06:03 PM IST

शिवसेनाप्रमुख टोचणार शिवसैनिकांचे कान

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आज संध्याकाळी मुंबईतल्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी शिवसेनाप्रमुख संवाद साधणार आहेत.

Jan 19, 2012, 11:37 AM IST

मनपाचे लॅपटॉप नगरसेवकांकडेच!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही नगरसेवकांनी त्यांना दिलेले लॅपटॉप परत केलेले नाहीत. फक्त २२७ पैकी दोन नगरसेवकांनी लॅपटॉप परत केलेत.

Jan 18, 2012, 10:12 AM IST

‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Jan 10, 2012, 04:42 PM IST

युतीविरोधात 'स्वाभिमान'चा सिनेमा

मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचारासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे सज्ज झालेत. महापालिकेतील युतीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नितेश यांनी मुंबईतल्या पाणी टंचाईवर लक्ष केंद्रीत केलंय.

Jan 7, 2012, 10:51 PM IST

प्रगतीपुस्तक अजय बोरस्तेंचं

आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून विद्यमान नगरसेवक अजय बोरस्ते इच्छुक आहेत. मागील दोन टर्मपासून या वॉर्डमधून ते निवडून आलेत. त्यांची कार्यकुशलता बघून त्यांना उपमहापौरपदही देण्यात आलं.

Dec 27, 2011, 09:48 AM IST

‘करून दाखवलं’

राहुल शेवाळे

उद्धवजींच्या संकल्पनेतून वचननामा सिद्ध केला गेला. त्या वचननाम्यातून आम्ही जनतेला जी कामं करण्याचं वचन दिलं होतं, ती सर्व कामं आम्ही करून दाखवली आहेत. आणि या सर्वाची माहिती लोकांना व्हावी यासाठी करून दाखवलं, हे कॅम्पेन आम्ही चालवलंय.

Dec 14, 2011, 06:37 PM IST

मुंबईत आरपीआयला 25 ते 30 जागा ?

झी 24 तास वेब टीम, मुंबई

Nov 28, 2011, 05:33 PM IST

मनसेच्या इंजनाला 'यूपी'चे डबे ?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झालीय. आश्चर्याची बाब म्हणजे मनसेकडून उमेदवारी मिळावी यासाठी उत्तर भारतीयही प्रयत्न करताहेत. त्यामुळं मनसेचा मराठी मुद्दा हा फक्त मुखवटा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

Nov 23, 2011, 06:43 AM IST

राष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव

मुंबई महापालिकेत आघाडी करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसांत घ्या अन्यथा राष्ट्रवादीची सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे असं सांगत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

Nov 10, 2011, 10:21 AM IST

भीमशक्ती होणार २३ जागांची मनसबदार?

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीतर्फे भीमशक्तीसाठी २३ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भीमशक्तीसाठी शिवसेना १६ तर भाजपा ७ जागा सोडण्यास तयार असल्याचं वृत्त आहे.

Nov 1, 2011, 06:12 AM IST