मनसेच्या इंजनाला 'यूपी'चे डबे ?

Last Updated: Wednesday, November 23, 2011 - 06:43

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झालीय. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मनसेकडून उमेदवारी मिळावी यासाठी उत्तर भारतीयही प्रयत्न करताहेत. त्यामुळं मनसेचा मराठीचा मुद्दा हा फक्त मुखवटा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

 

मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. यात मराठी माणूस हा अजेंडा असलेल्या मनसेनंही जोरदार तयारी सुरू केलीय. मराठी माणसांसाठी आंदोलन करणारा असा पक्ष असणारा आणि उत्तर भारतीय नेत्यांना फटकारणारा नेता अशी प्रतिमा असतानाही अनेक उत्तर भारतीय मनसेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

 

मनसेच्या या दुटप्पी भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. एरवी मराठी माणसाचा मुद्दा रेटायचा आणि निवडणुका आल्यावर भूमिका बदलायची, ही नीती स्वार्थाची असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या उत्तर भारतीय नेत्यांनी मराठी - अमराठी वादाला तोंड फोडलं होतं. मात्र मनसेकडून निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीयांनी इच्छा व्यक्त केल्यानं मनसेचा मुद्दा त्यांनाही पटलाय असंच आता म्हणावं लागेल.

First Published: Wednesday, November 23, 2011 - 06:43
comments powered by Disqus