राष्ट्रकुल स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, प्रदीप सिंगला रौप्यपदक

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली. 

Apr 9, 2018, 07:52 AM IST

CWG 2018: वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केलीये. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेय. तिने १९६ किलो वजनी (८६ किलो स्नॅच आणि ११ किलो क्लीन अँड जर्क)  उचलत हे जेतपद जिंकले. 

Apr 5, 2018, 11:47 AM IST

CWC 2018: महिला हॉकी संघाचा सलामीलाच पराभव, वेल्सकडून ३-२ने पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.

Apr 5, 2018, 08:53 AM IST