राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Feb 15, 2024, 05:32 PM IST

पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे. 

 

Feb 13, 2024, 11:19 AM IST

Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?

NCP Party and Symbol : तुम्हाला माहितीये का? संपत्तीच्या बाबतीत देखील अजित पवाराच 'दादा' ठरले (Ajit Pawar Net Worth) आहेत. शरद पवार यांची संपत्ती किती आहे? पाहा...

Feb 6, 2024, 10:05 PM IST

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला

Lok Sabha Election 2024 :  राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. 

Jan 29, 2024, 09:24 AM IST

रोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं आणि त्यानंतर ते चौकशीसाठी ईडीपुढं हजरही झाले. पण, प्रश्न असा की हे ईडी म्हणजे नेमकं काय? 

 

Jan 24, 2024, 11:49 AM IST

ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

Rohit Pawar ED Enquiry: आज ईडीने रोहित पवार यांना मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशासाठी बोलावलेला आहे. बारामती ॲग्रो प्रकरणावरुन (Baramati Agro) राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. असं असतानाच हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात...

Jan 24, 2024, 11:38 AM IST

लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?

Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा 

 

Jan 16, 2024, 11:33 AM IST

शिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार

Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.

Jan 11, 2024, 06:49 PM IST

'पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो' अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करुन बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण यात कोणतंही मॅचफिक्सिंग नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत आलेल्यांबरोबर फसवणूक करायची नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Dec 22, 2023, 05:26 PM IST

Maharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"

Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.

Oct 23, 2023, 06:25 PM IST

ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?

भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?

Oct 14, 2023, 05:09 PM IST

राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 

Oct 6, 2023, 07:11 PM IST

अजितदादा कोणाचे? शरद पवारांची गुगली, महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम

Maharashtra Politics : अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानं महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. शरद पवारांच्या गुगलीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aug 25, 2023, 08:19 PM IST

अजित पवारांकडून 'गलती से मिस्टेक' माफी मागितली; म्हणाले, 'मला चंद्रकांत...'

चांद्रयान मोहिमेचे कौतुक करताना, चुकलेल्या शब्दा बद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कामाच्या व्यापात अशा चूका होता, पण त्याचा बाऊ केला गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

 

Aug 25, 2023, 02:53 PM IST

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST