लालकृष्ण अडवाणी

'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'

देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

Jun 18, 2015, 02:01 PM IST

अडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.

Feb 26, 2015, 04:46 PM IST

अडवाणींचा पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा विवाह

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने मोठ्या उत्साहात लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.  लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा , अडवाणींनी पुन्हा एकदा लग्न केल्यासारखा होता, कारण पत्नी कमला यांच्या गळ्यात अडवाणींनी वरमाला घातली.

Feb 23, 2015, 07:05 PM IST

पद्म पुरस्कार जाहीर: अडवाणी, अमिताभ यांना पद्मविभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विजय भटकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Jan 25, 2015, 08:43 PM IST

पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2015, 10:06 AM IST

अडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं

शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.

Oct 2, 2014, 06:53 PM IST

भाजपमधून अटल, अडवाणी, जोशी युगाचा अंत

भारतीय जनता पक्षातून आता अटल, अडवाणी आणि जोशी युगाचा पूर्णपणे अंत झाला झाला. याचा पुरावा ही अमित शहा यांची नवी टीम आहे. या तिघांना संसदीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Aug 26, 2014, 05:17 PM IST

कर्णधार मोदींनी पहिल्याच कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकलं

कर्णधार नरेंद्र मोदींनी पहिल्याच कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकलं, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींविषयी काढले आहेत.

Jun 29, 2014, 11:28 PM IST

अडवाणींकडून हिरावली संसद भवनातील खोली

केंद्रात बहुमतात आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळाच्या सुरूवातीलाच, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना संसद भवनातील कार्यालय सोडावं लागलं आहे.

Jun 5, 2014, 09:31 PM IST

...आणि लालकृष्ण अडवाणी भावूक झालेत !

आज भाजपची संसदीय बोर्डाने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले. लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी भावूक झालेत. त्यानंतर अडवाणी यांची बोलण्याची वेळ आली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी झालेत. त्यावेळी भावूक होण्याचे कारण सांगितले.

May 20, 2014, 04:18 PM IST

अडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?

नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.

May 18, 2014, 02:47 PM IST

लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...

भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.

Mar 20, 2014, 02:10 PM IST

नाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!

भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.

Mar 20, 2014, 09:24 AM IST