अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं निधन

Last Updated: Sunday, March 09, 2014, 17:01

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे

Last Updated: Friday, February 21, 2014, 13:11

शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसारखी तुम्हाला तुमच्या गालावर खळी हवीय... तुम्हाला करिना कपूरसारखं सुंदर नाक हवंय...तुमचं हे स्वप्न सत्यात उतरु शकतं... आणि तेही केवळ दोनशे रुपयांत... हो...अगदी केवळ दोनशे रुपयांतच... कसं तर पहा हा रिपोर्ट....

IPLमध्ये एन्ट्री करणार सलमान, घेणार टीम?

Last Updated: Friday, February 14, 2014, 17:32

अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटानंतर आता सलमान खानलाही आता आयपीएल खुणवत आहे. सलमान खान एखाद्या संघात मालक म्हणून प्रवेश करू शकतो.

`तुटलोय-फुटलोय, घायाळ झालोय पण बरा आहे`

Last Updated: Thursday, February 06, 2014, 07:42

जखमी शाहरुख खान पुन्हा शुटींगसाठी हजर झालाय. सध्या तो फराह खानचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या `हॅपी न्यू इअर`च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

शाहरूखच्या खांद्याला फ्रॅक्चर, विश्रांतीचा सल्ला

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:53

शाहरूख खानच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि गुडघ्याला मार लागला आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खानला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फरहा खानच्या ` हॅपी न्यू ईयर ` चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा ही दुर्घटना घडली.

शाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी

Last Updated: Thursday, January 23, 2014, 17:15

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

सलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!

Last Updated: Friday, January 17, 2014, 19:59

बॉलिवूडमधले दोन दबंग ‘खानां’मध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर आता हळूहळू संपत चालल्याचं चित्र आहे. मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या गिल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि शाहरुख खान या दोहोंना पुन्हा एकदा एकमेकांना गळाभेट देताना पाहायला मिळालं.

बॉलीवुडचे तीन खान विभागले तीन पक्षांमध्ये!

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:15

आगामी निवडणुकांच्या धामधुमीत बॉलिवूडची तीन खान मंडळी 3 पक्षांमध्ये विभागले गेलेत. किंग खान शाहरुख खान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा समर्थक आहे तर आमीर खान यांनी आम आदमी पार्टीचं समर्थन केलंय. तर तिकडे सलमान खाननं मोदींबरोबर पतंगबाजी करून आपला मार्ग कोणते हे दाखवलंय.

अहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा

Last Updated: Friday, January 10, 2014, 12:17

सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.

शाहरुख-दीपिकाच्या `हॅप्पी न्यू -इअर`चं पोस्टर रिलीज

Last Updated: Thursday, January 02, 2014, 20:46

फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.

पाहा... शाहरुखच्या `हॅपी न्यू इअर`चा फर्स्ट लूक!

Last Updated: Thursday, January 02, 2014, 10:15

दिग्दर्शिका फराह खान हिचा ‘हॅप्पी न्यू इअर’ यंदा दिवाळीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

रात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...

Last Updated: Monday, December 23, 2013, 16:38

सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा सह-कलाकार बोमन इराणीसोबत सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण, दोघांचं ‘व्हिडिओ गेम प्ले स्टेशन – ४’ चे कट्टर फॅन आहेत.

आमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’

Last Updated: Sunday, December 15, 2013, 19:26

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नवनवीन खुलासे आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. म्हणजे हा भाग अजून प्रसिद्ध व्हायचाय...

माझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान

Last Updated: Thursday, December 05, 2013, 10:14

सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.

माझं कौमार्य शाबूत - सलमान खान

Last Updated: Monday, December 02, 2013, 12:46

‘कॉफी विथ करण’च्या धमाकेदार नवीन सीझनची सुरुवात झालीय. या शोमध्ये येण्याचा पहिला मान मिळाला तो अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना...

सलमान म्हणतो, शाहरुख माझा `मित्र`!

Last Updated: Monday, November 18, 2013, 11:02

बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘दबंग’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूख यांच्या चाहत्यांना एक आश्चर्यचकित करणारा पण गोड धक्का बसला.

हॅपी बर्थडे किंग खान!

Last Updated: Saturday, November 02, 2013, 17:01

बॉलिवूडमधील ‘किंग खान’ शाहरुख शनिवारी ४८ वर्षीय झाला. शाहरुखानच्या चाहत्यांनी त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर पोस्टर आणि फटाक्यांसह गर्दी केली होती. त्याने आपल्या चाहत्यांचे सोशल वेबसाईट ट्विटरद्वारा आभार व्यक्त केलेत.

सचिनच्या १९९व्या टेस्टसाठी बिग बी, शाहरूख येणार!

Last Updated: Monday, October 21, 2013, 11:28

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.

बॉलिवूडच्या बादशहानं चोरलं हॅरी पॉटरच्या लेखिकेचं भाषण?

Last Updated: Monday, October 07, 2013, 13:22

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननं हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिचं भाषण चोरल्याचा आरोप होतोय. शाहरुखनं ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत

Last Updated: Tuesday, October 01, 2013, 14:10

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भव्यसेट जळून खाक झाला आणि हा कार्यक्रम बंद पडणार का, याचीच चर्चा सुरू होती. मात्र, `कॉमेडी नाईट्स विथ कपील` हा विनोदी कार्यक्रम सुरू राहण्याची आशा आहे. आता कपिलला अभिनेता शाहरूख खान मदतीसाठी पुढे सरसावलाय.

माझा पुढचा सिनेमा शाहरुखचे सगळे रेकॉर्ड्स मोडेल- सलमान

Last Updated: Thursday, September 12, 2013, 23:11

रमझानमधील इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखने एकमेकांना आलिंगन दिलं, तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्या आहेत, असं वाटलं होतं. मात्र बॉलिवूडचा किंग होण्याच्या बाबतीत दोघंही एकमेकांचे वैरीच आहेत, हे सलमान खानने आपल्या बोलण्यातून पुन्हा दाखवून दिलं.

चेन्नई एक्सप्रेस : तीन दिवसांत शंभर कोटी!

Last Updated: Monday, August 12, 2013, 12:36

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन अभिनित दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’नं केवळ तीन दिवसांत शंभर करोडचा टप्पा पार केलाय.

किंग खान करतोय डबल सेलिब्रेशन...

Last Updated: Monday, August 12, 2013, 08:16

किंग खान शाहरुखसाठी यंदाची ईद डबल सेलिब्रेशनची ठरलीय. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर येत्या तीन दिवसांत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असंच चित्र सध्या दिसू लागलंय.

ईदचा मुहूर्त शाहरुखला की सलमानला लकी?

Last Updated: Thursday, August 08, 2013, 14:07

ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर फिल्म झळकवण्याची प्रथा आता किंग खाननेही सुरू केलीये. ईदच्या मुहूर्तावर किंग खान चेन्नई एक्स्प्रेस घेऊन बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सलमानप्रमाणे त्यालाही ईदचा मुहूर्त लकी ठरणार काय, याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

शाहरूख 'दुनियादारी' करू नकोस - मनसे

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 16:13

दुनियादारी हा चित्रपट काढल्यास शाहरूख खानचा राज्यात एकही शो होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.

सलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख

Last Updated: Friday, July 26, 2013, 12:06

बॉलिवूडमध्ये किंग खान आणि दबंग स्टार सलमान खान यांनी गळाभेट घेतली. निमित्त होतं ते इफ्तार पार्टीचं! शाहरूख आणि सल्लूची गळाभेट सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीबाबत शाहरूखने काहीही मी बोलणार नाही असे म्हटलंय.

‘करण-अर्जुन’ एकत्र आले!

Last Updated: Sunday, July 21, 2013, 22:19

शाहरुख-सलमान खान यांची अखेर गळाभेट झाली आहे. पुन्हा एकदा ‘करण-अर्जुन’ एकत्र आले आहेत. वांद्रे इथे काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत खान वॉर संपलं.

अंकिताच्या नावाची शाहरुखकडून वर्णी!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:59

‘पवित्र रिश्ता’मधली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे हिदेखील शाहरुखसोबतच बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवणार असं दिसतंय

दीपिकाला उचलून शाहरूखने मारले फेरे

Last Updated: Thursday, June 27, 2013, 16:46

बॉलिवूडमध्ये सध्या काही होईल हे सांगता येणार नाही. चक्क अभिनेता शाहरूखने दीपिका पदुकोणला आपल्या बाहुपाशात घेत तिला उचलले. तेवढ्यावरच न राहता तो चालत सुटला.

शाहरुखपेक्षा रोहीतच लोकांना जास्त आवडतोय!

Last Updated: Friday, June 14, 2013, 14:51

चेन्नई एक्सप्रेसचा फर्स्ट ट्रेलर लोकांसमोर आला तो सुसाट वेगानेच. ‘बॉलीवूडचा बादशहा’ म्हणून ओळख असणारा शाहरूख खान येत्या ८ ऑगस्टला रिलीज होणा-या चेन्नई एक्सप्रेसमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येतोय

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 14:52

शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शाहरुख- आमिर अखेर सिनेमात एकत्र

Last Updated: Monday, April 15, 2013, 16:55

आमिर खान आणि शाहरुख खान अखेर पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. हिंदी सिनेप्रेमी हा संगम बघण्यास खूपच उत्सुक होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण होत आहे.

सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`!

Last Updated: Monday, April 08, 2013, 19:32

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. पण आता सलमान खान शाहरुखच्या जवळ जाणार आहे. मनाने नाही... तर सलमान खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारच्याच इमारतीत घर घेत आहे.

शाहरुखनं मनोज कुमारची ‘शांती’ पुन्हा भंगली!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 14:29

मनोज कुमार... बॉलिवूड दिग्गजांपैकी एक अभिनेता. मनोज कुमार यांचा शांत स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा. पण, आता मात्र ते शांत होण्याच्या मन: स्थितीत नाहीत. आता मात्र आपण ‘ओम शांती ओम’च्या निर्मात्यांना सहजासहजी सोडणार नाही, असा निश्चय मनोज कुमार यांनी केलाय.

शाहरुख-सलमान जपानमध्ये आमने-सामने!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 16:12

शाहरुख खान आणि सलमान खानमधील दुश्मनी आता त्यांच्याइतकीच प्रसिद्ध आहे. दोघेही अभिनेते एकमेकांचं तोंड पाहात नाहीत. एकमेकांबद्दल बोलणंही टाळतात. आणि बोलले तर एकमेकांना टोमणेच जास्त मारतात. मात्र आता शाहरुख सलमान एकत्र दिसणार आहेत.. ते ही जपानमध्ये...

करण–शाहरुखचं न तुटणारं नातं!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 14:31

करण जोहर आणि शाहरुख खान या दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलंय, या बातमीला करणनं साफ धुडकावून लावलंय.

शाहरुखसाठी त्यांनी घर सोडलं

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:08

मायानगरीचं अर्थात बॉलीवुड आणि झगमगत्या दुनियेचं आकर्षण सा-यांनाच असतं. त्यात बॉलीवुडचा किंग खान शाहरुखचे तर कोट्यवधी चाहते. मात्र शाहरुखच्या भेटीसाठी दोन अल्पवयीन मुलींनी हरियाणातून घरातून पलायन केल्याची घटना घडलीय.

शाहरूख खान मुलीला बनवणार हिरोईन

Last Updated: Thursday, March 07, 2013, 15:50

हिंदी चित्रपट अभिनेता किंग खान शाहरूख खान हा आपल्या १२ वर्षीय लाडक्या मुलीला हिरोईन बनविणार आहे. तशी त्याची इच्छा आहे. पाचगणी येथे पत्रकारांशी बोलताना शाहरूख खाननेच ही माहिती पीटीआयला दिली.

शाहरुखच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’वर सलमानचा टोमणा

Last Updated: Tuesday, February 05, 2013, 07:19

एका जाहिरातीचं शुटिंग करत असताना जेव्हा सलमान खानला सूचना करण्यात आल्या, तेव्हा सलमान खान विलक्षण संतापला. संतापाच्या भरात आपला शत्रू असलेल्या शाहरुख खानसारखं तोंड करत शाहरुखला टोमणा मारला.

मला भारतीय असल्याचा अभिमान - शाहरुख खान

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 08:58

मला भारतीय असल्याचा गर्व असल्याचं शाहरुख खान याने ठणकावून सांगितलं आहे. मी असुरक्षित वाटत असल्याचं मी कधीच म्हटलं नाही. आधी माझे लेख वाचा, मग बोला असा सल्ला शाहरुख खानने दिला आहे. प्रत्येक जाती, धर्माच्य़ा लोकांकडून मला प्रेम मिळालं. माझे संपूर्ण कुटुंब एक मिनी इंडिया आहे - शाहरुख खान.

स्वत:चं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून !

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:45

अभिनेता शाहरुख खानची पाठराखण करण्यासाठी आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक पुढे सरसावले आहेत.

शाहरुखला सुरक्षा द्या, पाक गृहमंत्र्यांचा भारताला अनाहूत सल्ला

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 10:13

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.

शाहरुखला हाफिझ सईदचं आमंत्रण

Last Updated: Sunday, January 27, 2013, 15:49

२६/११च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिझ मोहम्मद सईद याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून मला काय वाटतं?’ हा लेख वाचला आणि त्याला पाठिंबा देत पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

शाहरुखने मारला विद्याला प्रेंग्नेंसीवर टोमणा!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 17:56

हजरजबाबीपणात बॉलिवुडचा अभिनेता शाहरुख खान सर्वात पुढे असतो. असे काही क्षण आहेत की त्याने आपल्या कुशलतेचा परिचय दिला आहे.

प्रियंकाच्या बाबतीत शाहरुखचा संयम सुटला

Last Updated: Wednesday, December 05, 2012, 15:49

काही फॅन्सचं म्हणणं होतं, की प्रियंका चोप्राने शाहरुखला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे. मात्र यावर ना शाहरुखने काही स्पष्टिकरण दिलं ना प्रियंकाने. मात्र नुकत्याच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखचा संयम सुटला.

सलमानशी मतभेद दूर होतील, पण...: शाहरुख

Last Updated: Saturday, November 17, 2012, 00:07

अभिनेता सलमान खान यांच्याशी बऱ्याच वर्षांपासून झालेले मतभेद कोणताही चित्रपट, अभिनेत्री किंवा कोणताही निर्माता दूर करू शकत नाही आणि हे मतभेद सार्वजनिक कार्यक्रमातही दूर होऊ शकत नाही, असे शाहरुख खानने स्पष्ट केले आहे. आमच्यातील मतभेद है वैयक्तीक पातळीवर झाले आहेत, ते आम्हीच दूर करू शकतो.

बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:53

य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.

मला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके

Last Updated: Wednesday, November 07, 2012, 16:08

शाहरुख खानने केलेल्या रोमँटिक सिनेमांनी त्याला सुपरस्टार बनवलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, वीर जारा यांसारख्या रोमँटिक सिनेमांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब दिला. मात्र स्वतः शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमांस’ म्हणवून घेणं पसंत नाही.

शाहरूख – प्रियंका चोरी चुपके...

Last Updated: Sunday, November 04, 2012, 15:19

अभिनेता शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्यात चक्कर सुरू असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गौरी खान नाराज असल्याने शाहरूखने प्रियंकापासून फारकत घेतल्याने प्रेमाची होत असलेली चर्चा संपली असे म्हटले जाते होते. मात्र, त्यांचं प्रेम संपलं असं होत नाही. शाहरूखच्या बर्थडेला चक्क प्रियंकाने भला मोठा गुच्छ पाठवून आजही विसले नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दोघांमधील नाजूक संबंध वृद्धींगत झाल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख-कतरिनाच्या गरमागरम दृष्ट्यांनी सलमान अस्वस्थ

Last Updated: Friday, October 12, 2012, 21:59

शाहरुख खानसह आपला आगामी चित्रपट ‘जब तक है जान’ या चित्रपटाबाबत कतरिना कैफ खूपच उत्साहीत आहे, मात्र तिला बॉलिवुडमध्ये एन्ट्री करून देणारा सलमान खान मात्र खूपच अस्वस्थ झाला आहे. या चित्रपटात कतरिना आणि शाहरुख यांच्या काही इन्टिमेट सीन्स आहेत, अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सलमान नाराज झाला आहे.

शाहरुख-कतरीनाची जवळीक....

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:38

शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.

यंदा दिवाळी शाहरुखची की अजयची?

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:59

गेल्या वर्षी दिवाळीत शाहरुख खानचा रा.वन प्रदर्शित झाला होता. तशी दरवर्षी दिवाळी ही शाहरुखसाठी चांगलीच ठरते. पण यावर्षी दिवाळीत शाहरुखला तगडी स्पर्धा द्यायला अजय देवगण उतरला आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातलं शीतयुद्ध जगप्रसिद्धच आहे.

शाहरूख-फराह खानमध्ये पॅचअप

Last Updated: Tuesday, April 03, 2012, 10:46

शाहरूख खान आणि फराह खान यांच्यात अखेर पॅचअप झाले आहे. मात्र, या दोघांनी काही समेट घडवून आणलेले नाही. किंग खान आणि फराह यांच्यात पुन्हा मैत्रिचा हात पुढे करण्यासाठी साजिद खान यांने एक पाऊल पुढे केले. साजिदने आपल्या बहिणीसाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.