ghatkopar building accident

घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर

घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्त अजोय मेहतांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये  सुनिल शितपचाच बेजबाबदरापणा कारणीभूत ठरवण्यात आला आहे. पिलर तोडल्यामुळेच बिल्डींग पडली. तसंच एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचं म्हटलं आबे. या अहवालात एन वॉर्डच्या स्थानिक वैद्यकीय अधिका-यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे आणि उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या चौकशी समितीने हा अहवाल तयार केला आहे.

Aug 23, 2017, 03:52 PM IST

घाटकोपर दुर्घटना : ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून ते बचावले

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आला. ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून असूनही ५७ वर्षीय राजेश जोशी बचावलेत. 

Jul 27, 2017, 05:27 PM IST

घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी घेतले ताब्यात

घाटकोपरच्या दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरु असेलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला. आणि इमारात जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नुतनीकरनाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किेटेक्टला आज ताब्यात घेण्य़ात आलंय.

Jul 27, 2017, 04:03 PM IST

घाटकोपर दुर्घटनेची 'पारदर्शक' चौकशी करा - राणे

घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.

Jul 26, 2017, 10:38 PM IST

घाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

 घाटकोपर येथील सिद्धी-साई  इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.

Jul 26, 2017, 07:07 PM IST