rajiv gandhi

सोनियांनी सांगितलं, राजीव गांधींशी लग्न करण्याचं कारण

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक किस्सा सांगितला आहे, सोनिया गांधी यांनी गंमतीत खुर्शीद कसुरी यांना उत्तर दिलं होतं की, आपण राजीव गांधी यांच्याशी यांच्यासाठी लग्न केलं, कारण राजीव एक 'सुंदर युवक' आहेत.

Sep 6, 2015, 07:47 PM IST

राजीव गांधी योजना अधिक झाली 'फलदायी'!

गरजू ज्येष्ठ  नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता गुडघा शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलाय. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय. 

Sep 2, 2015, 02:36 PM IST

`राजीव आणि संजय गांधींना अल्लाहनं दिली शिक्षा`

आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी तसंच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर `शिलान्यास` घडवून आणण्यासाठी अल्लाहनंच संजय गांधी आणि राजीव गांधी यांना शिक्षा दिली`

Apr 12, 2014, 09:00 AM IST

राहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.

Feb 20, 2014, 05:17 PM IST

अरे हे काय पंतप्रधान संतापले

तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.

Feb 20, 2014, 01:43 PM IST

राजीव गांधींचे मारेकरी तीन दिवसांत मुक्त होणार?

सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द केल्यानंतर आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवरून जोरदार राजकारण सुरु झालंय. राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात मारेकऱ्यांची सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा काल सुनावली होती. हा निर्णय झाल्यानंतर आज तामिळनाडू सरकारने सात मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतलाय.

Feb 19, 2014, 05:56 PM IST

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही, जन्मठेप

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Feb 18, 2014, 11:00 AM IST

`दंगल पेटली आणि राजीव गांधी फोन रिसिव्ह करत नव्हते`

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शीख दंगलीवर दिलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटनानांनी निदर्शनं केली आहे. आता माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या तत्कालीन प्रेस सचिव यांनी दिलेल्या वक्तव्यावरून पुन्हा राजकीय वनात रान पेटलं आहे.

Jan 30, 2014, 01:43 PM IST

राजीव गांधींची २२ वी पुण्यतिथी

राजीव गांधी...भारताचे माजी पंतप्रधान...या द्रष्ट्या नेत्याची आज 22 वी पुण्यतिथी....मतदानाचं वय 21 व्या वर्षावरुन 18 वर आणणा-या राजीव गांधीचं भारताच्या जडणघडणीतलं योगदान असामान्य....राजीव गांधींना झी मीडियाचा सॅल्यूट...

May 21, 2013, 11:07 PM IST

`स्वीडिश कंपनीचे दलाल होते राजीव गांधी`

विकीलिक्सच्या आणखी एका धक्कादायक खुलाशाने भारतीय राजकारणात आणखी एक भूकंप झालाय. पंतप्रधान होण्यापूर्वी राजीव गांधी यांनी साब-स्कॅनिया या स्वीडीश कंपनीसाठी दलाली केल्याचा दावा विकिलिक्सनं वेबसाईटवर केलाय.

Apr 9, 2013, 09:34 AM IST

राजीव गांधी स्वीडिश कंपनीचे दलाल होते- विकीलीक्स

विकीलिक्सच्या नव्या खुलाशाने भारतीय राजकारणात भूकंप आला आहे. या वेबसाइटने दावा केला आहे की, राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी जेव्हा पायलट म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका स्वीडिश कंपनी साब स्कॉनियासाठी दलालीचे काम करत होते. तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

Apr 8, 2013, 01:12 PM IST

`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.

Feb 10, 2013, 09:06 PM IST

राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही मिनिटे आधी घेण्यात आलेली एलटीटीईच्या आत्मघातकी पथकाची दोन छायाचित्र सगळ्या जगाने पाहिली...त्याच दोन फोटोवरुन तपास यंत्रणांनी राजीव गांधींच्या खुन्यांना शोधून काढलं...

Oct 31, 2012, 10:27 PM IST