दिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय

100 एसएमएसनंतर, पुढील एसएमएसवर 50 पैसे लागणारा चार्ज बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Jun 6, 2020, 05:57 PM IST
दिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने  (TRAI) मोबाईल वापरकर्त्यांसाठी काहीसा दिलासा दिला आहे. TRAIने एका सीममधून दररोज 100 एसएमएस SMS पाठवण्याची FUP लिमिट संपुष्ठात आणली आहे. 100 एसएमएसनंतर, पुढील एसएमएसवर 50 पैसे लागणारा चार्जही बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता दररोज 100हून अधिक मेसेज करता येऊ शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. TRAIने एसएमएससाठी टॅरिफच्या नियमांबाबत 'टेलिकम्युनिकेशन टॅरिफ ऑर्डर 2020'चा ड्राफ्ट तयार केला आहे. 

आतापर्यंत टेलिकॉम ऑपरेटर्स दररोज 100 SMSच्या लिमिटनंतर प्रत्येक SMSवर कमीत कमी 50 पैसे चार्ज करतात. हा नियम 2012मध्ये लागू झाला होता. TRAIने टेलिकॉम सब्सक्रायबर्सला UCC (अनसॉलिसिटेड कमर्शल कम्युनिकेशन्स) पासून वाचवण्यासाठी रोज 100 एसएमएसची मर्यादा ठेवली होती. 

TRAI कंपन्यांना स्पॅम SMSवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्ग आणण्याबाबत सांगत आहे. 2017 मध्ये TRAIने UCCवर बंदी घालण्यासाठी TCCCPR सादर केलं होतं. TCCCPR 2018 नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क टेक्नोलॉजीवर आधारित आहे. हे स्पॅम एसएमएसवर अंकुश लावू शकतं. TRAIने स्पॅम एसएमएसवर बंदी घालण्यासाठी 100 एसएमएसनंतर त्यापुढील मेसेजवर 50 पैसे चार्ज लावला होता. हा चार्ज TCCCPR (टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफेरेंस रेग्युलेशन्स) च्या रुपात लागू झाला होता. परंतु आता तो मागे घेण्यात आला आहे.

हा निर्णय लागू करण्यासाठी TRAIने टेलिकम्युनिकेशन्स टॅरिफ ऑर्डर, 2020चा ड्राफ्ट तयार केला होता. यात 2012 साली SMS संबंधी लावण्यात आलेला नियम मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. म्हणजेच TRAIने दररोज 100 एसएमएसनंतर त्यापुढी SMSवर 50 पैसे चार्ज हटवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर TRAIने स्टेकहोल्डर्सकडून 3 मार्चपर्यंत लिखित आणि 17 मार्चपर्यंत काऊंटर कमेंट मागितले होते. त्यानंतर TRAIने हा निर्णय घेतला आहे.