ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचे खास फिचर्स

ह्युंडाई मोटर इंडियाने आपल्या वेरना या नव्या कारवरून आता पडदा उठवला आहे. आणि आता ही नवी कार २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 8, 2017, 09:11 PM IST
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचे खास फिचर्स  title=

चैन्नई : ह्युंडाई मोटर इंडियाने आपल्या वेरना या नव्या कारवरून आता पडदा उठवला आहे. आणि आता ही नवी कार २२ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.

आतापासूनच या कारच्या बुकिंगसाठी प्रेक्षक आतुर आहेत. वेरनाचं हे मॉडेल संस्करणची पाचवी पिढी आहे. या कारची स्पर्धा होंडा सिटी, फॉक्सगन वेंटो, स्कोडा रॅपिड आणि मारुती सुझुकी सियाज या कारशी असणार आहे. आता आपण या वेरना कारचे खास फिचर्स जाणून घेऊया.... 

१) सनरुफ - 
नव्या वेरना कारमध्ये इलेक्ट्रिक ऑपरेटेड सनरुफ देण्यात आलं आहे. या सेगमेंटमधील सनरुफ असणारी ही दुसरी कार आहे. याआधी होंडा सिटीमध्ये सनरुफ देण्यात आलं होतं. दरम्यान, मारुतीच्या सियाजमधील अपडेट व्हर्जनमध्ये देखील हे फीचर मिळणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे ग्राहक जास्त आकर्षित होत आहेत. 

२) प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स - 
रात्री ड्रायव्हिंग करताना प्रोजेक्टर लेन्सचं खूपच गरजेचं आहे. यामुळे रात्री गाडी चालवताना रस्ता स्पष्ट दिसतो. आणि या प्रोजेक्टरमुळे अपघातांवर देखील आळा बसू शकतो. नव्या वेरना कारमध्ये फॉग लॅम्प्समध्येही प्रोजेक्टर लेन्स देण्यात आलं आहे. त्यामुळे या कारला अधिक मागणी असल्याचं सांगितलं जात आहे. 

३) हॅण्ड्स फ्री बूट -
नव्या वेरना कारमध्ये बूट लिड खोलण्यासाठी हाथ लावण्याची गर नाही. यामध्ये हॅण्डस फ्री बूट रिलीज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

४) कूल्ड सीट - 
या कारमध्ये पुढच्या बाजूला वेंटिलेटेड म्हणजेच हवेशीर सीट असणार आहेत. हे फीचर ह्युंदाईच्या एलांट्रा कारमध्येही देण्यात आलं आहे. अशा पद्धतीच्या सीटमुळे दूरच्या प्रवासातही अजिबात त्रास होत नाही.

५) इको कोटिंग -  
प्रवास आरामदायी होण्यासाठी इको कोटिंग फीचर देण्यात आलं आहे. या फंक्शनमुळे गाडीत दुर्गंधी जाणवू लागल्यास ती तात्काळ शोषली जाईल. ज्यामुळे प्रवास आरामदायी होईल.

६) पेट्रोल आणि डिझेलवर उपलब्ध - 
नवी वेरना कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.6 लीटरचं ड्यूल व्हीटीव्हीटी इंजिन मिळेल. ज्यामध्ये 123 जीपीएस पॉवर आणि 155 एनएम टार्क असणार आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.6 लीटर यू2 सीआरडीआय व्हीजीटी इंजिन असणार आहे. ज्यामध्ये 128 पीएस पॉवर आणि 260 एनएम टार्क असणार आहे. दोन्ही इंजिनसाठी 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅँडर्ड आहे.

नव्या वेरनामध्ये एकूण 12 व्हेरिएंट आहे. ज्यामध्ये सहा पेट्रोल आणि सहा डिझेल व्हेरिएंट आहेत. नव्या वेरनामध्ये एकूण सात कलर उपलब्ध असणार आहेत. या कारचं बुकिंग २२ ऑगस्ट म्हणजे मंगळवारी होणार आहे.