एअरटेलच्या 'या' पॅकमध्ये मिळेल दररोज 3.5GB डेटा...

जिओला टक्कर देण्यासाठी नवीन वर्षात भारतीय एअरटेलने 799 रूपयांचा पॅक सादर केला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 2, 2018, 01:27 PM IST
एअरटेलच्या 'या' पॅकमध्ये मिळेल दररोज 3.5GB डेटा... title=

नवी दिल्ली : जिओला टक्कर देण्यासाठी नवीन वर्षात भारतीय एअरटेलने 799 रूपयांचा पॅक सादर केला आहे. हा पॅक प्रीपेड सब्सक्राईबर्ससाठी असेल. 799 रूपयांच्या या पॅकमध्ये ग्राहकांना 3.5 जीबी डेटा दररोज मिळेल. याशिवाय अनलिमिडेट लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉईस कॉल मिळेल. त्याचबरोबर 100  लोकल आणि एसटीडी एसएमएस रोज मिळतील.

नवीन पॅक

यापूर्वी एअरटेल याच प्लॅनमध्ये 3GB डेटा देईल. आता यात बदल करण्यात आला आहे. आणि त्यात 3.5GB डेटा मिळेल. तर जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळेल. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन्हीही कंपन्यानी 799 रुपयांचा प्लॅन पूर्वीच सादर केला आहे. मात्र एअरटेलने या नवीन प्लॅनच्या अंतर्गत 799 रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज  3.5GB डेटा मिळेल. 

कॅशबॅक

एअरटेलच्या 799 रूपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल दररोज 250 मिनीटे आणि दर आठवड्याला 1000 मिनिटं मिळतील. ही मर्यादा लोकल आणि एसटीडी दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त एअरटेल सब्सक्राइबर एअरटेल पेमेंट बॅंकच्या माध्यमातून रिजार्च करून या नवीन पॅकवर 75 रुपयांचे कॅशबॅक मिळेल.