IPhone Users : एक SMS करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे!

भारतात मोबाइल पेमेंट (Online Payment) अॅप्सचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. यात Paytm, Google Pay, BHIM आणि PhonePe सारख्या अॅप्सचा समावेश आहे. डिजिटल पेमेंटचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.

Updated: Aug 22, 2022, 02:17 PM IST
IPhone Users : एक SMS करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे! title=

IPhone Users : भारतात मोबाइल पेमेंट (Online Payment) अॅप्सचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. यात Paytm, Google Pay, BHIM आणि PhonePe सारख्या अॅप्सचा समावेश आहे. डिजिटल पेमेंटचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. मात्र, असे अ‍ॅप्स वापरताना काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते.सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एक चूक देखील तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. त्यातच आणखी एक माहिती मिळते की, ऍपल पे  मध्ये घोटाळा झाला असून त्यामधून आपले बॅक खाते रिकामे होऊ शकते. असे असताना अ‍ॅप्सचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी त्याविषयी जाणून घेऊया.  

स्कॅमवॉच ऑस्ट्रेलियाने आयफोन वापरकर्त्यांना सर्कतेचा इशारा दिला आहे. Apple Pay Scam असा एक text sms आहे. या मेसेजवर क्लिक करतातच ऍपल चे सर्विस खाते बंद करून आपल्या बॅक खातेतील सर्व माहिती हॅक केली जाऊ शकते. या घटना ऑस्ट्रेलियामध्ये जास्त प्रमाणात आढळून आल्या आहेत.  

यासंदर्भात स्कॅमवॉच ऑस्ट्रेलियाने ट्विट केले असून, iphone users ला सर्कतेचा इशारा दिला आहे.  फिशिंग या संदेश पासून सावध राहण्यास सांगितले. नाहीतर तुमचे बॅक खाते बंद होईल. तसेच एक लिंक बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये #scam वापरून आपले कार्ड  आणि बॅक खात्याची सर्व माहिती हॅक केली जाते. 

ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर कमिशन (ACCC) या ऑस्ट्रेलियन मीडिया कंपनीने सांगितले की, जुलै 2022 मध्ये Apple Pay घोटाळा संदर्भात सुमारे 40 अहवाल सापडले. ज्यामध्ये 1,000 डॉलर पेक्षा जास्त नुकसान झाले. आयफोन वापरकर्ते अशा पैशांच्या चोरी घोटाळ्यांना बळी पडू नये म्हणून काय करू शकतात ते जाणून घ्या.

ऍपल पे घोटाळ्यापासून आपल्या आयफोनचे संरक्षण कसे करावे

- क्रेडिट कार्डनंबर कोणालाही शेअर करू नका
- two factor authentication चा कोड आणि Apple Password कोणालाही शेअर करू नका
- सॉफ्टवेअर डाउनलोड करावे
- खातरजमा होत नाही तोपर्यंत कोणत्याही लिंकवर किल्क करू नका. तसेच लिंक शेअर करू नका. 
- तुम्हाला एखादा संशयास्पद SMS आल्यास आणि तो SMS Apple कडून असावा असे वाटत असल्यास त्या SMS चा स्क्रीनशॉट काढून reportfishing@apple.com वर कळवा.