लवकरच लॉन्च होणार सर्वात स्वस्त iPhone; काय आहेत फिचर्स?

काय आहे या आयफोनची किंमत?

Updated: Feb 11, 2020, 01:16 PM IST
लवकरच लॉन्च होणार सर्वात स्वस्त iPhone; काय आहेत फिचर्स? title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : जगभरात लवकरच लॉन्च होणाऱ्या ऍपलचा (Apple) नवा फोन 'iPhone SE 2' बाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ऍपलच्या स्वस्त आयफोनाबाबत मोठी चर्चा आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन आयफोन SEच्या स्मार्ट व्हर्जनमध्ये लॉन्च केला जाणार असून त्याचं नाव 'आयफोन ९' असल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच जवळपास २८,४०० रुपये असू शकते.

काय असतील फिचर्स -

या नव्या 'आयफोन ९'मध्ये, आधी बाजारात आणलेल्या 'आयफोन ८' प्रमाणे डिझाइन असण्याची शक्यता आहे. नव्या आयफोनमध्ये ४.७ इंची डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनद्वारे ऍपल कंपनी, टच आयडी फिचर पुन्हा एकदा आणू शकते. 'आयफोन ११' सीरीजमध्ये देण्यात आलेला, ए१३ बायोनिक प्रोसेसर या फोनमध्येही देण्यात येऊ शकतो.

'आयफोन ९'ची किंमत -

सर्वच आयफोन नेहमीच महाग असतात, अशी अनेकांची धारणा असते. पण आता 'iPhone SE 2' किंवा 'iPhone 9'ची किंमत आधीच्या ऍपल फोनच्या तुलनेत अतिशय कमी असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या फोनची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच २८,४०० रुपये इतकी असू शकते. एका रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार मार्चमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'iPhone 9'च्या लॉन्चिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

परवडणाऱ्या किंमतीत Poco X2 लॉन्च; पाहा जबरदस्त फिचर्स