'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. 

Updated: Jun 13, 2018, 08:52 PM IST
'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज

मुंबई : भारतीय दूरसंचार निगम कंपनी अर्थात बीएसएनएलने  रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. बीएसएनएलच्या नवीन ऑफरचे नाव फिफा वर्ल्ड कप स्पेशल डेटा एसटीव्ही १४९ असे आहे.  फिफा वर्ल्डकपच्या दरम्यान बीएसएनएलचा हा प्लॅन मर्यादित असेल. म्हणजेच, ग्राहकांना या प्लॅनचा फायदा १४ जून ते १५ जुलैपर्यंत घेता येणार आहे. 

दरम्यान, एअरटेलनेही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ आपल्या ग्राहकांना पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी १०० मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.  

बीएसएनएलने हा प्लॅन रिलायन्स जिओच्या १४९ प्लॅनला टक्कर देण्यासाठी बाजारात आणला आहे. रिलायन्स जिओने आता रोज अतिरिक्त १.५० जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता १४९ रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना दररोज ३ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. यासोबतच कॉल आणि एसएमएस सुद्धा करता येणार आहेत. तर ७९९ रुपयांच्या रिचार्जवर सर्वाधिक ६.५० जीबी डेटा रोज मिळणार आहे. बीएसएनएलचा १४९ रुपयांचा हा प्लान आजपासून लागू करण्यात आला आहे. बीएसएनएलची सेवा देशभरात आहे, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close