Elon Musk: एलॉन मस्कने श्वानाला केलं Twitter चा नवा CEO; म्हणाला 'दुसऱ्यांपेक्षा हा....'

Elon Musk Twitter New CEO : ट्विटरचे मालक एलन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ट्विटरची  मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. अशातच आता एलन मस्क यांनी ट्विटरचा नवा सीईओची घोषणा केली आहे. 

Updated: Feb 15, 2023, 01:37 PM IST
Elon Musk: एलॉन मस्कने श्वानाला केलं Twitter चा नवा CEO; म्हणाला 'दुसऱ्यांपेक्षा हा....'  title=

Twitter New CEO : टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे (SpaceX) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि  मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) नेहमी चर्चेत असतात. ट्विटरची  मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आज त्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही फोटो ट्विट करत म्हंटल आहे की,”ट्विटरचा नवा सीईओ आश्चर्यकारक आहे” आणि तो इतर सीईओपेक्षा खूप वेगळा आहे. (Twitter New CEO)

दरम्यान  जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने (Elon Musk )पुन्हा एकदा आपल्या कारनाम्याने सर्वांना चकीत केले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या एलन मस्कने स्वत:चे नावच बदल्यानंतर त्यांनी आता ट्विटरसाठी नवा सीईओची घोषणा केली आहे.

वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार! 

विशेष म्हणजे ट्विटरचा नवा सीईओ हा माणूस नसून एक श्वान (कुत्रा) आहे. तो मस्कचा पाळीव कुत्रा फ्लोकी आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांचा कुत्रा फ्लोकी "दुसऱ्या माणसापेक्षा" चांगला आहे, जरी त्याने कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव घेतले नाही. दरम्यान इलॉन मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर त्याचे सीईओ होते आणि सीईओ बनल्यानंतर त्यांनी पराग अग्रवालसह अनेकांना दिलासा दिला होता.

सीईओ बनल्यानंतर इलॉन मस्कने आपल्या कुत्र्याचे कौतुक केले आहे आणि सांगितले आहे की तो नंबर्समध्ये खूप चांगला आहे आणि त्याची शैली देखील आहे. इलॉन मस्कच्या या ट्विटला आतापर्यंत सुमारे 20 हजार लोकांनी लाईक केले असून 10.6 मिलियन व्ह्यूज झाले आहेत. दुसर्‍या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ट्विटरचे संचालक मंडळ इलॉन मस्क आहेत, जरी लोक एलोन मस्कचे हे सर्व ट्विट विनोद म्हणून पाहत आहेत.