अर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये

Facebook Instagram Thread Whatsapp Down : तुम्हालाही फेसबुक- इन्स्टा लॉगईन करता येत नव्हतं का? जाणून घ्या मार्क झुकरबर्गलाही कसा बसला याचा फटका...   

सायली पाटील | Updated: Mar 6, 2024, 11:39 AM IST
अर्रsss! तासभर Facebook- Instagram काय गंडलं; मार्क झुकरबर्गनं गमावले 8,28,95,95,000 रुपये  title=
Facebook Instagram Thread Whatsapp Down Mark Zukerberg Lost 100 Million Dollars

Facebook Instagram Thread Whatsapp Down : स्मार्टफोनचा वापर हल्ली प्रत्येक व्यक्ती करताना दिसतो. मुळात हा स्मार्टफोन जी मंडळी वापरत असतात त्यांचा सर्वाधिक वावर असतो तो म्हणजे सोशल मीडियावर. फेसबुक, इन्स्टाग्रमला तर अनेकांची प्राधान्यानं पसंती. अनेकदा तर, काहीही हेतू नसतानाही काही मंडळी फेसबुक आणि इन्स्टाच्या वॉलवर स्क्रोल करत असतात. या सर्वच मंडळींचा जीव मंगळवारी सायंकाळी कासावीस झाला. कारण, Facebook Instagram ही माध्यमं तासाभरासाठी ठप्प झाली होती. 

तासाभरानं अब्जावधींचं नुकसान 

इथं मेटाच्या सुविधा आणि अॅप जवळपास एका तासासाठी बंद झाले, युजर्सना त्यात लॉगईनही करता येईना आणि इथं मार्क झुकरबर्गही काहीसा चिंतेतच आला. कारण, या गोंधळामध्ये त्यानं अनेक अब्जावधी रुपये गमावले. एक तास फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड आणि व्हॉट्सअप बंद असल्यामुळं युजर्सना कोणत्याही माध्यमाचा वापर करता येईना. लॉगईन डिटेल देऊनही अकाऊंट अॅक्सेस मिळेना शेवटी या साऱ्यांच्या पदरी मनस्ताप आला. 

वीबुश सिक्योरिटीजच्या कार्यकारी संचालकपदी असणाऱ्या डॅन इव्ज यांनी 'डेलीमेल'ला दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकारामध्ये मार्क झुकरबर्गनं 100 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 8,28,95,95,000 रुपये  गमावले. इतकंच नव्हे, तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार मेटाच्या शेअरची किंमतही 1.6 टक्क्यांनी कोसळली. आता या एका तासानं मार्कचं नेमकं किती नुकसान झालं असेल त्याचा विचार करा. 

हेसुद्धा वाचा : ....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही

 

इथं मेटापुढं अनेक आव्हानं उभी असतानाच तिथं X चा मालक, एलॉन मस्क यानं मात्र या क्षणी असुरी आनंद व्यक्त केला. 'तुम्ही आता काही पोस्ट वाचत आहात तर, त्याचं कारण म्हणजे आमचा सर्वर सुरळीत काम करत आहे', असं तो म्हणाला. फक्त मस्कच नव्हे, त्याच्यामागोमाग मग, नेटकऱ्यांनीही मेटाची खिल्ली उडवत असंख्य मीम शेअर केले. तिथं मेटानं मात्र घडल्या प्रकारासाठी आणि गैरसोयीसाठी नेटकरी, युजर्सची माफी मागत सर्वकाही पूर्ववत झाल्याचं स्पष्ट केलं. 

श्रीमंतांच्या यादीत मार्क कितवा? 

नुकताच मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी मार्क आणि त्याची पत्नी भारतात आले होते. इथं त्यांची चर्चा सुरु असतानाच तिथं मेटा अडचणीत आलं. असा हा मार्क जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अर्थात फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्स यादीमध्ये झुकरबर्ग पाचव्या स्थानावर आहेत. इथं त्यांची एकूण संपत्ती 139.1 बिलियन डॉलर इतकी असल्याचं सांगितलं जातं. 2023 मध्ये हाच आकडा 84 84 बिलियन डॉलरनं वाढला होता.