'फेसबूक'ला हवेत २० हजार कर्मचारी, पगार ४ लाख रुपये

फेसबूकमध्ये नोकरीची संधी

Updated: Sep 5, 2018, 04:37 PM IST
'फेसबूक'ला हवेत २० हजार कर्मचारी, पगार ४ लाख रुपये title=

मुंबई : फेसबूकनं काही दिवसांपूर्वी दहशतवाद संबंधित आणि अश्लिल कंटेंट हटवण्यासाठी २० हजार कंटेंट मॉडरेटर्सची नियुक्ती करणार असल्याचं सांगितलं होतं. आता यासाठीची पावलं उचलायला फेसबूकनं सुरुवात केली आहे. हजारो पदवीधर उमेदवारांनी फेसबूकमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

प्रादेशिक भाषांमध्ये होत आहे नियुक्ती

कंटेट मॉडरेटर्सची नियुक्ती करण्यासाठी फेसबूकनं बिजनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) कंपनी जेनपॅक्टला कंत्राट दिलं आहे. ही कंपनी मराठी, पंजाबी, तामीळ, कन्नड, उडिया, नेपाळी या भाषांसाठी कंटेंट मॉडरेटर्स घेणार आहे. जेनपॅक्टनं ऑनलाईन एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत.

काय असणार काम?

फेसबूक मॉडरेटर म्हणून नियुक्ती झाली तर यूजरनं फेसबूकवर टाकलेल्या कंटेट आणि व्हिडिओला मॉनिटर आणि मॉडरेट करण्यात येईल. लैंगिक शोषण, दहशतवाद, लहान मुलांचं लैंगिक शोषण, आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ आणि हिंसात्मक कंटेटवर कारवाई आणि असा कंटेट डिलीट किंवा ब्लॉक करण्याचं काम फेसबूक मॉडरेटरला करावं लागणार आहे. कंटेंट मॉडरेटर्सना वर्षाला २.५ लाख ते ४ लाख रुपयांचं पॅकेज देण्यात येणार आहे. महिन्याच्या पगाराबरोबरच मंथली इन्सेंटिव्हही मिळणार आहे.