हार्ले डेव्हिडसनच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज, भारतातील मॅनिफॅक्चरिंग प्लांट बंद

भारतात Harley-Davidson चं उत्पादन बंद

Updated: Sep 25, 2020, 07:09 PM IST
हार्ले डेव्हिडसनच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज, भारतातील मॅनिफॅक्चरिंग प्लांट बंद title=

मुंबई : मोटरसायकल कंपनी हार्ले डेव्हिडसनने भारतीय बाजारासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की, भारतात ते आपला बिझिनेस मॉडेल बंद करणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रक्रियेचा एक भाग म्हणून बावळ (हरियाणा) येथे आपला मॅनिफॅक्चरिंग प्लांट बंद करण्याची आणि गुरगाव येथील सेल्स ऑफीसचा स्टाफ कमी करण्याची तयारी आहे.

एवढेच नव्हे तर कंपनी आपल्या सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राहकांना याबाबत माहितीही देत ​​आहे. कंपनीने सांगितले की, कंपनीच्या डीलर नेटवर्क करारानुसार ते ग्राहकांची सेवा सुरू ठेवतील. ते म्हणाले की, देशातील आपला व्यवसाय चालविण्यासाठी कंपनीला भागीदाराबरोबर करार करायचा आहे.'

कंपनीच्या या निर्णयामुळे 70 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाईल. 23 सप्टेंबर 2020 पासून पुढील 12 महिन्यांत मंजूर गोष्टी पूर्ण केल्या जातील. हार्ले डेव्हिडसनच्या पोर्टफोलिओमध्ये स्ट्रीट 750, आयरन 883 सारख्या काही इतर मोटारसायकलींचा समावेश आहे. बातमीनुसार, कंपनीचा अंदाज आहे की 2020 मध्ये रिस्ट्रक्चरिंग खर्च कमीत कमी 75 दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल.

भारतात कमी विक्री

हार्ले डेव्हिडसनची भारतात विक्री कमी होत होती. आर्थिक वर्ष 2019 मध्ये हार्ले डेव्हिडसन बाईकची विक्री 22 टक्क्यांनी खाली आली आहे. बातमीनुसार, कंपनी या वर्षी केवळ 2,676 वाहने विकू शकली. गेल्या आर्थिक वर्षात 3,413 वाहने कंपनीने भारतात विकली होती. भारतात विकल्या गेलेल्या 65 टक्के बाईक्स या 750 सीसी क्षमतेपेक्षा कमी आहेत.