Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...

Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का? 

सायली पाटील | Updated: Mar 4, 2024, 03:28 PM IST
Google Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...  title=
how to save Toll Money with Google Maps know details

Save Toll Money with Google Maps: भारतात आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या नेव्हिगेशन अॅपचा वापर बरेचजण करतात. हातात स्मार्टफोन असणारा प्रत्येकजण हे अॅप कधी ना कधी वापरतो. काही स्मार्टफोनमध्ये गुगलचं हे अॅप प्रीलोडेड असतं. फक्त एखाद्या ठिकाणाची अचूक वाट दाखवणंच नव्हे, तर त्या ठिकाणाच्या आजुबाजूला असणाऱ्या महत्त्वाच्या जागा, रेस्तराँ, ऐतिहासिक ठिकाणं अशी लांबलचक यादी या अॅपमधून मिळते. 

अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी नेमकं कोणत्या दिशेला वळायचं आणि कोणत्या दिशेला वळायचं नाही याची माहिती गुगल मॅप्समधून मिळते. पण, तुम्हाला या अॅपमधून मिळणारी आणखी एक मदत माहितीये का? Google Map आता तुमचे पैसेही वाचवणार आहे. कारण, कोणत्या रस्त्यावर टोल आहे आणि त्याला पर्यायी मार्ग कोणता आहे आणि कुठं तुम्हाला वाहतूक कोंडी मिळणार नाही या साऱ्याची मदत हे अॅप तुम्हाला करणार आहे. 

अगदी सोप्या पद्धतीनं  Google Maps च्या सहाय्यानं तुम्ही महामार्ग आणि टोलपासून दुसऱ्या वाटांनी इच्छित स्थळी मार्गस्थ होऊ शकता. यामुळं तुम्हाला काहीसा वेळ जास्त लागला तरीही प्रवास कमी खर्चात होईल हे नक्कीच. 

कसा कराल गुगल मॅपचा योग्य वापर? 

  • सर्वप्रथम Google Maps चं अॅप सुरु करा. 
  • यानंतर तुमच्या प्रवासाचं सुरुवातीचं ठिकाण आणि अपेक्षित स्थळी पोहोचण्याचं ठिकाण नमूद करा. 
  • यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये तीन टींब दिसतील. तिथं क्लिक करा. 
  • आता तुमच्यासमोर एक पर्याय येईल तिथं एक पर्याय निवडा. 
  • पुढे Avoid tolls आणि Avoid motorways हे पर्याय On करा. 

हेसुद्धा वाचा : मैत्रिणीचा संसार मोडत तिच्याच पतीशी 'या' अभिनेत्रीनं केलं लग्न; नात्याची 15 वर्ष पूर्ण होताच म्हणते... 

गुगल मॅपचं हे फिचर तुम्हाला असे रस्ते दाखवेल जिथं टोलसाठी पैसे आकारले जात नाहीत. ही सेटींग सुरु करताच गुगल तुमचा प्राधान्यक्रम जाणन त्या अनुषंगानं तुम्हाला पुढंगी मार्गदर्शन करत राहीस. त्यामुळं पुढच्या सर्व प्रवासांमध्ये गुगल न चुकता तुम्ही कधी काळी निवडलेला हा पर्याय लक्षात ठेवत त्याच दृष्टीनं मदत करत राहील. काय मग, तुम्ही कधी वापरताय गुगलचं हे फिचर?