बहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये

Why is the Color of AC Only White ? तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारल्यास यापुढे, ठाऊक नाही बुवा; असं म्हणण्यापेक्षा एकदा वाचून घ्याच यामागचं कारण. कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा   

Updated: May 22, 2023, 11:28 AM IST
बहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये  title=
Interesting fact Why is the Color of AC Only White know the reason

Why is the Color of AC Only White ? मागील काही दिवसांपासून उन्हाळा चांगलाच वाढताना दिसत आहे. ज्यामुळं सकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या आपोआपच कमी झाली आहे. मुळात जी मंडळी घरात किंवा ऑफिसमध्ये आहेत तीसुद्धा आता महत्त्वाची कामं असूनही सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडत नाहीयेत. कारण, म्हणजे आग ओकणारा सूर्य. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात उन्हाळ्याची काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहेत.

बाहेर तापमान वाढतच चाललेलं असताना प्रत्येकाहा हात पंख्याच्या रेग्युलेटरकडे किंवा AC कडे जात आहे. सध्या बहुतांश घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, दुकानांमध्ये एसी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा दाह वाढणार लक्षात घेता अनेकजण एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करताना दिसतात. तिथे गेल्यावर मग स्प्लिट एसी की विंडो एसी खरेदी करायचा यावर विचार करण्यास, तिथं असणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सुरुवात होते. (Interesting fact Why is the Color of AC Only White know the reason)

तुम्हीही कधी एसी खरेदीसाठी गेला असाल, किंवा कुठेही तुम्हाला कधी एसी युनिट दिसलं असेल तर एक गोष्ट पाहिलीये का? बरेच AC, त्यांचे युनिट पांढऱ्या रंगात असतात. पण, असं नेमकं का माहितीये? 

जाणून घ्या यामागचं कारण 

पांढरा रंग सूर्याची किरणं जास्त प्रमाणात परावर्तित करतो. यामुळं तापमानही कमी राहतं. पांढऱ्या किंवा कोणत्याही फिकट रंगाच्या बाबतीत असंच घडतं. थोडक्याच हे रंग उष्णता शोषून घेतता आणि एसीचं युनिट जास्त गरम होत नाही. पांढऱ्या रंगाचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळं एसी युनिच्या प्रतिरोधक आवरणाला सुरक्षित ठेवणं शक्य होतं. ज्यामुळं अंतर्गत भाग, कॉम्प्रेसर, कंडेंसर, इवॅपोरेटरवर याचा कोणताही परिणाम पडत नाही. 

हेसुद्धा वाचा : 'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ 

AC चे युनिट जेव्हाजेव्हा सावलीत ठेवले जातात तेव्हातेव्हा तापमान कमी ठेवण्यासाठी त्यांना कमीत कमी मेहनत घ्यावी लागते. सावलीत असल्यामुळं या युनिटवर सुर्यकिरणांचा परिणामही कमी होतो. ज्यामुळं त्याच्या कार्यपद्धतीवर फारसा परिणाम होत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळं वीजेची बचतही करता येते. 

एसीच्या युनिटमधील फरक 

सहसा विंडो एसीमध्ये एकच युनिट असतो. तो खिडकीमध्ये बसवला जातो. या युनिटचा एक भाग खिडकीबाहेर असतो. जेणेकरून तो वातावरणाशी ताळमेळ साधू शकेल. स्पिट एसीच्या बाबतीतल एक युनिट घराच्या किंवा खोलीच्या आत असतं आणि दुसरं बाहेर. इथं सहसा बाहेर असणारं युनिट पांढऱ्याच रंगाचं असतं. तर, आतमध्ये असणारे युनिट वेगवेगळ्या रंगाचे असू शकतात.