आताच खरेदी करा iPhone13, सुरुये Offers चा पाऊस; सरसकट 30 हजार रुपयांची सूट

तुम्हीही कधीपासून आयफोन घ्यायच्या विचारात आहात का? ही बातमी तुमच्यासाठी...     

Updated: Aug 2, 2022, 08:29 AM IST
आताच खरेदी करा iPhone13, सुरुये Offers चा पाऊस; सरसकट 30 हजार रुपयांची सूट  title=
iPhone13 Discount rates flipkart offers details

Phone 13 Price Cut: iPhone 14 ची सीरिज येत्या काही दिवसांमध्येच लॉन्च होण्यासाठी तयार आहे. पण, त्याआधी आयफोन 13 वरही दमदार सवलती देण्यात येत आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन 13 अतिशय कमी दरात विकला जात आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्हीही हा मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. 

iPhone 13 Offers And Discounts

iPhone 13 (128GB) ची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये इतकी आहे. पण, फ्लिपकार्टवर हा फोन 73,909 रुपयांतच तुम्ही खरेदी करु शकता. म्हणजेच या फोनवर 5991 रुपयांची घसघशीत सवलत मिळत आहे. याशिवाय बऱ्यात बंक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरही तुमच्यासाठी देण्यात आल्या आहेत. 

iPhone 13 Bank Offer

तुम्ही जर एचडीएफसी बँकचं कोणतंही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला iPhone 13 खरेदी करण्यासाठी 4 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. ज्यामुळं या फोनची किंमत 69,909 रुपये इतकी असेल. 

iPhone 13 Exchange Offer

iPhone 13 सर्वात मोठी सवलत ही 19 हजार रुपयांची आहे. तुम्ही जर जुना स्मार्टफोन इथं एक्सचेंज करता तर, तुम्हाला मोठी सवलत मिळू शकते. पण, ही 19 हजार रुपयांची सवलत तेव्हाच मिळेल जेव्हा जुना फोन सुस्थितीत आणि नव्या एडिशनचा असेल. जर या सर्व ऑफर मिळून तुम्ही आयफोन खरेदी करण्यासाठी पुढे सरसावलात तर अवघ्या 50,909 रुपयांमध्ये तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. 

काय मग? विचार कसला करताय? सवलतींचा हा पाऊस तुम्हाला चिंब भिजवण्यासाठी तयार आहे....