लेनोव्हाने लाँच केले ४ नवीन टॅबलेट्स...

लेनोव्हा कंपनीने सोमवारी ४ नवीन टॅबलेट्स भारतात लाँच केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 11:54 AM IST
लेनोव्हाने लाँच केले ४ नवीन टॅबलेट्स...  title=

नवी दिल्ली : लेनोव्हा कंपनीने सोमवारी ४ नवीन टॅबलेट्स भारतात लाँच केले. या टॅब्लेटच्या किंमती 'टॅब ४ ८' -१२,९९० रुपये,  'टॅब ४ ८' - १६,९९० रुपये, 'टॅब ४ १० प्लस' - ३ जीबी व्हेरियंट - २४,९९० रुपये आणि 'टॅब ४ १० प्लस' - ४ जीबी व्हेरियंट - २९,९९० रुपये अशा आहेत. फ्लिपकार्डवर देखील हे टॅबलेट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट क्विक लॉग इन फीचर असून त्यामुळे डिव्हाईस सुरक्षित राहण्यास मदत होते. 

लेनोव्हा इंडीयाचे मार्केटिंग डायरेक्टर भास्कर चौधरी यांनी सांगितले की, "भारतीय कुटुंबातील मल्टिपल युजर्स ही संकल्पना लक्षात घेऊन टॅब ४ ची निर्मिती करण्यात आली आहे."

८ इंचाच्या या टॅब ४-८ मध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. तर १० इंचाच्या टॅब ४-१० प्लस मध्ये ३ जीबी रॅम आणि १६ जीबी रोम आहे. दोन्हीही टॅबमध्ये १.४ गिगाहर्ट्स स्पेनड्रॅगन क्वैड-कोर प्रोसेस आहे. 

टॅब ४-८ प्लस आणि टॅब ४-१० प्लस मध्ये २.० गिगाहर्ड्स क्वालकॉम ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. या डिव्हाईसचे बॅटरी बॅकअप २० तास चालेल, असा दावा कंपनीने केला आहे.