1 लाखांचा Apple MacBook Air फक्त 53 हजारांत, कसं ते जाणून घ्या

M1 MacBook Air: सण सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऑफर्सदेखील सुरू होतात. खरेदीची हीच सुवर्णसंधी चालून आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2023, 05:11 PM IST
1 लाखांचा  Apple MacBook Air फक्त 53 हजारांत, कसं ते जाणून घ्या title=
M1 MacBook Air for Rs 52 999 during Amazon Great Indian Festival sale

Apple Macbook Air M1 Offers: सणा-सुदीच्या दिवसात नवीन वस्तू घरी आणण्याची प्रथा आहे. काही दिवसांतच दसरा (Dussehra Offer) येतोय दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू घरी आणून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. भारतात सण-समारंभ सुरू झाल्यानंतर अनेक ईकॉमर्स वेबसाइटकडून सेल सुरू होतात. या सेलदरम्यान भन्नाट ऑफर्स आणि डिस्काउंट देण्यात येतात. तुम्हीदेखील लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात. तर विंडोज लॅपटॉपच्या तुलनेत Apple Macbook Air हा बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. कसं ते जाणून घेऊया. ( 

Apple Macbook Air तुम्ही अर्ध्या किमतीत खरेदी करु शकणार आहात.  Amazon Great Indian Festival सेलमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे. इथून तुम्ही 1 लाख रुपयांचा अॅपल लॅपटॉप फक्त 53 हजारांमध्ये खरेदी करु शकणार आहात. अॅपल मॅकबुक एयर एम 1 अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 99,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 

डिस्काउंट आणि ऑफर

Amazon Great Indian Festival मध्ये तुम्ही Apple Macbook Air डिस्काउंटनंतर 62,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तसंच, जर तुमच्याकडे एसबीआय बँक कार्ड असेल तर त्यावर तुम्हाला 3,750 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह प्राइज 59,240 रुपये इतकी होईल. इतकंच नव्हे तर, यावर 6,241 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील मिळणार आहे. त्यानंतर Apple Macbook Air तुम्हाला 52,999 रुपयांना मिळणार आहे. 

कधी सुरू होतोय अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल?

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 8 ऑक्टोबर 2023पासून सुरू होतोय. मात्र, प्राइम मेंबर या सेलचा फायदा एक दिवस आधीपासूनच म्हणजे 7 नोव्हेंबरपासून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला 6 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता लॉगइन करावे लागणार आहे. 

स्पेसिफिकेशन 

अॅपल मॅकबुक एयर एम 1 मध्ये 13.30 इंचाच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2560/1600 पिक्सल आहे. लॅपटॉपमध्ये M1 चिपसेट देण्यात आला आहे. हा 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये ब्लूट्यूथ, 2 युएसबी पारोट, हेडफोन आणि माइक कॉम्बोसारखे पोर्ट्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये MacOS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून याचे वजन 1.29 किलोग्रॅम देण्यात आले आहे.