Whatsapp मुळे जास्त डेटा खर्च होतोयं ? वापरा या ट्रीक्स

व्हॉट्सअॅपच्या सेटींग्ज ऑप्शनमध्ये जाऊन काही पर्याय बदलावे लागतील.

Updated: Oct 15, 2018, 03:33 PM IST
Whatsapp मुळे जास्त डेटा खर्च होतोयं ? वापरा या ट्रीक्स title=

नवी दिल्ली : जगभरात व्हॉट्सअॅप युझर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. बहुतांशजण दिवसभर व्हॉट्सअॅपवरच असतात. एका निरिक्षणानुसार भारतात 20 कोटी जण पूर्णवेळ व्हॉट्सअॅपवर सक्रिय असतात. या सर्वात मोबाईल इंटरनेट डेटा सर्वात जास्त खर्च होत असतो. जर तुम्ही मोबाईल डेटा युजेज सेटींग्स वेळोवेळी बदलली नाही तर तुमचा डेटा लवकर संपू शकतो. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटींग्ज ऑप्शनमध्ये जाऊन काही पर्याय बदलावे लागतील. आम्ही तुम्हाला काही खास टीप्स देत आहोत.

इथे जाऊन ‘When using mobile data’ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर ऑडियो, व्हिडिओ, फोटो जिथे गरज नाहीयं तिथे ऑटो डाऊनलोडींग बंद करु शकता. अशा प्रकारे तुम्ही सर्व ऑप्शन्सचं मॅन्युयल डाऊनलोडींगही करु शकता.

चॅट बॅकअप 

व्हॉट्सअॅप सेटींग्जमध्ये जाऊन चॅट ऑप्शनवरील चॅट बॅकअपवर क्लिक करा. चॅट बॅकअपमध्ये जाऊन ओवर वायफाय ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. यामुळे केवळ वायफाय सुरू असतानाच व्हॉट्सअॅप चॅट बॅकअप घेईल.

खूप सारे नवे फिचर्स 

आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप काही काळानंतर नवनवीन प्रयोग करत असतं.

यावेळेसही व्हॉट्सअॅप काही नवे फिचर्स घेऊन येतयं. या फिचर्सच्या मदतीने युजर्सचं व्हॉट्सअॅप वापरण अधिक सोपं होणार आहे. एक चांगला अनुभव युजर्सना घेता येणार आहे.

'स्वाइप टू रिप्लाय' 

 व्हॉट्सअॅपमध्ये 'स्वाइप टू रिप्लाय' हे फिचर्स येत्या काळात पाहायला मिळणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मेसेजला तात्काळ उत्तर देऊ शकणार आहात.

उत्तर देण्यासाठी मेसेजला केवळ स्वाइप करावं लागणार आहे. राइट स्वाइप केल्यास मेसेज सेंड होऊ शकतो.

'पिक्चर इन पिक्चर'

व्हॉट्सअॅप आपल्या नव्या 'पिक्चर इन पिक्चर' फिचर्सचीही टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स युट्यूब, फेसबुकचे व्हिडिओ व्हॉट्सअॅप चॅटमध्ये प्ले करु शकतात.

'इनलाइन फिचर'

यासोबतच व्हॉट्सअॅप फोटोशी जोडलेलं आणखी एक फिचर लवकरच समोर येतयं. नव्या 'इनलाइन फिचर'च्या मदतीने युजर्स व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या फोटो हे प्रिव्ह्यू नोटीफिकेशनमध्ये दिसणार आहेत. या मेसेजच्या जागी सध्या फक्त कॅमेराचा आयकॉन दिसतो.

नवे स्टिकर्स

लवकरच तुम्हाला व्हॉट्सअॅपचे नवे स्टिकर्सही पाहायला मिळू शकतात. यावर्षी फेसबुकच्या एफ 8 डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कंपनीने याची घोषणा केलीयं. सध्या कंपनीतर्फे ‘Biscuit’ नावाच्या स्टीकरची टेस्टिंग सुरू आहे.

स्टेटसमध्ये जाहीराती 

थोड्या दिवसात तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही जाहीराती दिसू लागणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या स्टेटसमध्ये या जाहीराती दिसतील. इंस्टाग्रामच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारच्या जाहीराती दिसायला सुरूवातही झालीयं.