माकडाने वाघाला आणि मृत्यूला असा चकवा दिला

मृत्यूलाच तुम्ही चकवा देता, असाच एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 01:58 PM IST
माकडाने वाघाला आणि मृत्यूला असा चकवा दिला title=

मुंबई : तुमचा मृत्यू तुम्हाला समोर दिसतोय, तरीही जराही विचलित न होता,  त्या मृत्यूलाच तुम्ही चकवा देता, असाच एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

माकडावर हल्ला करण्यासाठी एक वाघ झाडावर

माकडावर हल्ला करण्यासाठी एक वाघ झाडावर चढतो, वाघ आणि त्याची शिकार अर्थात माकड यांच्यामध्ये फक्त काही फुटांचं अंतर असतं.... याक्षणी माकडानं प्रसंगावधान दाखवत वाघोबाचीच फजिती केली.

पळून जाण्याचा वेंधळेपणा केला नाही

माकड झाडावरुन उडी मारुन जमिनीवर पळालं असतं, तर वाघाने माकडाला झडप घालून सहज पकडलं असतं. म्हणूनच माकडानं पळून जाण्याचा वेंधळेपणा केला नाही.

माकडाने वाघाला टाकली गुगली

उलट वाघाला फांद्यांवरुन चालणं अवघड होणार, हे ओळखून माकडानं वाघोबाला असा काही हिसका दिला की वाघोबाच झाडावरुन धपकन खाली पडले. हा जबरदस्त व्हिडीओ कुठल्या जंगलात आणि कुठल्या पर्यटकानं काढला, हे कळू शकलेलं नाही.