आपल्या मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्ण संधी

मुंबई मेट्रोत महत्त्वाच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत..

Updated: Dec 31, 2019, 01:37 PM IST
आपल्या मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्ण संधी title=

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (MMRC) ने काही जागांवर भरती सुरू केली आहे. जर तुम्हाला मुंबई मेट्रोत नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. तर लवकरात लवकर तुमचा अर्ज दाखल करा. ही पदं अशी आहेत, डिप्टी टाउन प्लानर, आर्किटेक्टसह अनेक रिक्त जागा आहेत. 

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, २४ जानेवारी २०२०. यात सर्वात महत्वाचं म्हणजे या जागा कंत्राटी पद्धतीत भरल्या जाणार आहेत. यात तीन वर्षाचा टाईम पीरियड असणार आहे.

पदांची संख्या १२

खालील पदं भरावयाची आहेत...
डेप्युटी टाउन प्लॅनर- 2 
आर्किटेक्ट- 1 
डेप्युटी इंजीनियर- 1
अकाउंट्स ऑफिसर- 2 
अकाउंट्स ऑफिसर- 2 
डेप्युटी अकाउंटेंट- 4 

डेप्युटी टाउन प्लॅनर-

डेप्युटी टाउन प्लॅनरसाठी उमेदवार सिव्हिल इंजीनिअरिंग किंवा बीई अथवा बीटेक डिग्री धारक असावा. याशिवाय तुमच्याकडे आर्किटेक्चर बॅचलर डिग्री असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज दाखल करू शकता, यासोबत  अर्बन प्लानिंग आणि टाउन प्लानिंगमध्ये मास्टर डिग्री देखील असली पाहिजे.

याशिवाय प्लॅनर म्हणून कमीत कमी दोन वर्ष काम केल्याचा अनुभव देखील असला पाहिजे. यासाठी जास्तच जास्त वयोमर्यादा 35 वर्ष ठेवण्यात आली आहे.

पगार 60 हजारापासून 1 लाख 80 हजार प्रति महिना असला पाहिजे.

आर्किटेक्ट

या जागेसाठी उमेदवाराजवळ आर्किटेक्चरची बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
खासगी क्षेत्रातील उमेदवाराला कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
या पदासाठी वयोमर्यादा 35 वर्ष आहे.
पगार 60,000 पासून 1 लाख 80,000 हजार रूपयांपर्यंत.

डेप्युटी इंजीनिअर

या जागेसाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजीनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक केल्याची डिग्री हवी.
याशिवाय कन्स्ट्रक्शन सुपरव्हिजन आणि संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
या पदासाठी वयोमर्यादा 35 वर्ष आहे.
पगार 60,000 पासून 1 लाख 60,000 हजार रूपयांपर्यंत.

अकाउंट्स ऑफिसर

या जागेसाठी तुम्ही सीए किंवा सीडब्ल्यूए परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
या शिवाय संबंधित क्षेत्रात 5 वर्षाचा अनुभव असणे देखील महत्वाचे आहे. 
या पदासाठी वयोमर्यादा 35 वर्ष आहे.
पगार 60,000 पासून 1 लाख 60,000 हजार रूपयांपर्यंत.

डेप्युटी अकाउंटेंट

या जागेसाठी उमेदवार बीकॉम असणे गरजेचे आहे.
याशिवाय सीए किंवा सीडब्ल्यूए परीक्षा पास असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
या जागेसाठी संबंधित क्षेत्रात पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
या पदासाठी वयोमर्यादा 33 वर्ष आहे.
पगार 34,020 पासून 64,310 हजार रूपयांपर्यंत.