मोबईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 1 जुलैपासून देशभरात लागू होणार नवीन नियम

New Sim Card Rule: ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.  टेलिकॉम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाकडून मोबाइल सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 17, 2024, 03:09 PM IST
मोबईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 1 जुलैपासून देशभरात लागू होणार नवीन नियम  title=
new sim card rule from 1 july 2024 mnp not allowed

New Sim Card Rule: मोबाइल सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. टेलिकॉम रेगुलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (TRAI)कडून 15 मार्च 2024 रोजी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. 1 जुलै 2024पासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार नियमात बदल केल्यामुळं फ्रॉडच्या घटना रोखण्यात यश मिळू शकते. मात्र, यामुळं सामान्य युजर्सना त्रास सहन करावा लागू शकतो. 

नियमांत काय बदल झाले?

मोबाइल सिम कार्डसाठी हे नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. या नवीन नियमांतर्गंत ज्या मोबाइल युजर्सनी अलीकडेच त्यांचे सिम कार्ड स्वॅप केले आहे. तर ते त्यांचा मोबाइल नंबर पोर्ट करु शकत नाही. सिमच्या अदला-बदलीलाच सिम स्वॅपिंग असं म्हणतात. म्हणजेच, सिम कार्ड हरवल्यानंतर किंवा सीम तुटल्यानंतर सिम स्वॅपिंग केले जाते. अशावेळी तुम्ही तुमच्या टेलीकॉम ऑपरेटरकडून तुमचे जुने सिम बदलून नवीन सिम घेतले जाते. 

काय होणार फायदा?

ट्रायच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळं फसवणुकीच्या घटनांवर आळा बसेल. फ्रॉडच्या घटना थांबवण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. नवीन नियम फसवणुक करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा रिप्लेसमेंटनंतर लगेचच कनेक्शनला पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिम स्वॅपिंग म्हणजे काय?

आजच्या काळात सिम स्वॅपिंगचे फ्रॉड घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटना रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फ्रॉड करणारे तुमचे पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा फोटो मोठ्या सहजतेने मिळवतात. त्यानंतर मोबाइल हरवल्याचा बहाणा बनवून नवीन सिम कार्ड जारी करतात. त्यानंतर तुमच्या नंबरवर येणाऱ्या ओटीपी फ्रॉड करणाऱ्यांकडे आपोआप पोहोचला जातो. 

ट्रायची शिफारस 

ट्रायने दूरसंचार विभागाला एक नवीन सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे. ज्यात मोबाइल युजरच्या हँडसेटवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे नाव डिस्प्ले होईल. मग ते नाव कॉन्टेक्ट लिस्टमध्ये असो किंवा नसो. यामुळं फ्रॉडच्या घटनांवर आळा घालणे सोप्पे होईल. मात्र, यामुळं प्रायव्हसीवरुन सवाल उपस्थित होत आहेत.