भारतात आज लाँच झाली ह्युंदाई वरना

आज ह्युंदाईची Next-Gen Hyundai Verna 2017 ही कार लाँच झाली आहे. या कारची किंमत भारतात ७.९९ लाख रुपये असणार आहे. आणि या नव्या वरना कारची सर्वात मोठी चुरस ही होंडा सिटी, मारूती सुझुकी आणि फॉक्सवॅगन वेंटोसोबत असणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 22, 2017, 01:42 PM IST
भारतात आज लाँच झाली ह्युंदाई वरना  title=

नवी दिल्ली : आज ह्युंदाईची Next-Gen Hyundai Verna 2017 ही कार लाँच झाली आहे. या कारची किंमत भारतात ७.९९ लाख रुपये असणार आहे. आणि या नव्या वरना कारची सर्वात मोठी चुरस ही होंडा सिटी, मारूती सुझुकी आणि फॉक्सवॅगन वेंटोसोबत असणार आहे. 

ह्युंदाईची ही वरना नवी कार ६६  देशांमधील ८.८ दशलक्ष ग्राहकांसह पाचव्या पिढीतील वरना सेडान वारसा घेऊन पुढे जाईल. नवीन ह्युंदाई वरनाचे चार वेरिएंट आहेत. ते असे की वेरिएंट ई, ईक्स, एसएक्स आणि एसएक्स (ओ) असे आहेत. नवीन वरना कार पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मॅन्युअल आणि गिअरबॉक्स मिळणार आहे. 

पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये ईएक्स आणि एसएक्स (ओ) वेरिएंटमध्ये मिळेल. आणि डिझेल ऑटोमॅटिकमध्ये ईएक्स आणि एसएक्स वेरिएंटमध्ये असणार आहे.  या वरना कारला कंपनीने के २ प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. यामध्ये अनेक सेगमेंट फिचर देण्यात आले आहेत. 

टॉप वेरिएंटमध्ये एपल कारप्ले आणि एंड्रायड ऑटो सपोर्ट करणारे इंफोटेंमेंट सिस्टम, वेंटिलेटेड सीट, सनरूफ, रियर सन ब्लाइंड आणि सहा एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या वेरिएंचमध्ये एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) आणि ड्यूल एअरबॅग स्टँटर्ड देण्यात आले आहेत. 

Hyundai Verna 2017 - Sleek Silver Colour Option

आताच्या ह्युंदाई वरना एंट्री लेवलच्या वेरिएंटमध्ये १.४ लीटरचे पेट्रोल आणि डिझेलचे इंजिन लावण्यात आले आहे. आणि हे इंजिन तुम्हाला नव्या वरनामध्ये मिळणार नाही. नवीन वरनामध्ये १.६ लीटरचे इंजिन लावण्यात आले आहे. पेट्रोल वेरिएंटमध्ये १.६ लीटरचे ड्यूल वीटीवीटी इंजिन असून ज्यामध्ये १२३ पीएस पावर आणि १५५ एनएमचे टॉर्क देण्यात आले आहेत. डीझेल वेरिएंटमध्ये १.६ लीटरचे सीआरडीआय इंजिन आणि १२८ पीएस पावर आणि टॉर्क २६० एनएम आहे. दोन्ही इंजिनसोबत ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे.