तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी

दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Feb 26, 2020, 12:02 PM IST
तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : Oppo लवकरच बाजारात आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 'यूनिक कॅमेरा मॉड्युल' या फोनची विषेश बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने नुकताच एक पेटेंट फाईल केला आहे. ओप्पोच्या या नव्या फोनमध्ये oneplus7T सारखा कॅमेरा देण्यात आला आहे. या पेटेंटमध्ये दोन स्मार्टफोनबाबत माहिती देण्यात आली आहे. या दोन फोनपैकी एका फोनमध्ये ७ रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन  Oppo Reno सीरीजचे असल्याचं बोललं जात आहे.

कंपनीने नुकताच Oppo चा Reno 3 स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन चीनमध्ये एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. या फोनला ४ रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. ६.५ इंची एचडी डिस्प्ले, १०८० x २४००p रिझॉल्यूशन, Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर, १२ जीबीपर्यंत रॅम देण्यात आला आहे.

Oppo Find X2 

गेल्या कित्येक दिवसांपासून Oppoच्या आगामी Oppo Find X2 या फोनची चर्चा आहे. लवकरच हा फोन बाजारात लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये ६.५ इंची एमोलेड डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 865 चिपसेट, ८जीबी रॅमसह २५६जीबी इंटरनल स्टोरेज असणार आहे. या फोनमधील एक्सपान्डेबल स्टोरेजबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. Oppo Find X2 मध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सल सेकेंडरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर असणार आहे. त्याशिवाय ३२ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा असू शकतो.