LinkedIn चे 'बादशाह' पंतप्रधान नरेंद्र मोदी..

कुणाला टाकलं मागे 

LinkedIn चे 'बादशाह' पंतप्रधान नरेंद्र मोदी.. title=

मुंबई : फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर लिंक्डइनवर सुद्धा धुमाकूळ घालत आहे. लिंक्डइनच्या माहितीनुसार पीएम मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा या दोन्ही व्यक्तींची माहिती सर्वाधिक आहे. लिंक्डइच्या पाचव्या कार्यक्रमात 'इंडियाज पावर प्रोफाइल 2018' मध्ये बायोकॉनचे चेअरमन किरण मजूमदार शॉ, पेटीएमचे फाऊंडर विजय शर्मा, शाओमी इंडियाचे मनुकुमार जैन यांचा समावेश आहे. 

या रँकिंगवर यादी जाहीर 

लिंक्डइनने दिलेल्या माहितीनुसार, ही यादी कोणत्याही रँकिंगवर अवलंबून नाही. तर ही यादी ज्या व्यक्तीचं प्रोफाइल तर युझर्सकडून अनेकदा पाहिलं आहे अशा लोकांना स्थान देण्यात आलं आहे. या यादीतील नावे त्यांची प्रोफाइल ही अतिशय प्रोफेशनल्स समजली गेली. यामध्ये 8 कॅटेगिरी करण्यात आली आहे. यामध्ये सीईओ, वित्त लिंक्डइन इनफ्लुएंशर, इंटरनेट, मार्केटिंग आणि जाहिरात यांचा समावेश आहे. 

या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये देखील काम करणारी प्रियंका चोप्रा हीचं नाव देखील आहे. या दोघांच्या नावाचा खूप सर्च युझर्सकडून करण्यात आला.