फक्त 15,999 रुपयांत मिळतोय iPhone ला टक्कर देणारा दमदार स्मार्टफोन; 108MP चा कॅमेरा टीपणार HD फोटो

POCO X6 Neo 5G : सध्या मेमरी, कॅमेरा आणि सिक्युरिटी अशा निकषांना परिपूर्ण करणाऱ्या फोनची खरेदी करण्याकडेच अनेकांचा कल दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 13, 2024, 03:11 PM IST
फक्त 15,999 रुपयांत मिळतोय iPhone ला टक्कर देणारा दमदार स्मार्टफोन; 108MP चा कॅमेरा टीपणार HD फोटो title=
POCO X6 Neo 5G Price in India tech news in marathi

POCO X6 Neo 5G : एखाद्या चांगल्या स्मार्टफोनच्या (Smartphone) प्रतीक्षेत असणाऱ्या मंडळींची गाडी ही हँडसेटच्या किमतीवर येऊन थांबते. अनेकदा लाखांच्या घरात किमती असणारे फोन खरेदी करणं सर्वांनाच जमत नाही. पण, आता मात्र स्मार्टफोनची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडणार नाही. कारण, एक धडाकेबाज स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. POCO या कंपनीकडून POCO X6 Neo हा फोन लाँच करत X6 सीरिजमधील नवं मॉड्युल बाजारात आणण्यात आलं आहे. 

120Hz रिफ्रेश रेट असणारी AMOLED स्क्रीन या फोनचा लूक स्लिकस्मूथ करते. या मोबाईलमध्ये Dimensity 810 च्या रिब्रँडेड वर्जनचा MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे. 108MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असणाऱ्या या फोनला 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. IP54 रेटिंग असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत इतकी कमाल आहे की, एकिकडे आयफोनला टक्कर देणारे फिचर पाहता त्यासाठी आकारली जाणारी किंमत कमालीचा दिलासा देणारी आहे. 

ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असणारा हा स्मार्टफोन अर्थात पोको एक्स 6 निओ दोन कॉन्फिग्रेशनमध्ये मिळतो. याच्या बेस व्हॅरिएंटमध्ये  8GB RAM + 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. तर, दुसरा व्हॅरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनच्या दोन्ही व्हॅरिएंटची किंमत अनुक्रमे 15,999 रुपये आणि 17,999 रुपये इतकी आहे. 

हेसुद्धा वाचा : मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी 

सध्यातरी हा स्मार्टफोन Flipkart वर सहजपणे उपलब्ध होणार असून, 18 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून पुढेत्याची विक्री सुरु होणार आहे. या मोबाईलच्या खरेदीवर ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा इंन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. त्याशिवाय 1000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काऊंटही. किंमत जास्त वाटत असल्यास तुम्ही हा फोन नो-कॉस्ट EMI वरही खरेदी करू शकता. 5000mAh बॅटरी बॅकअप असणाऱ्या या फोनसाठी 33W चं सुपरफास्ट चार्जिंग मिळतं. तेव्हा आता आयफोनच्या कॅमेरालाही टक्कर देणारा हा फोन नेमका कधी खरेदी करायचा हे तातडीनं ठरवा.