सॅमसंगचा जबरदस्त सेल, टीव्ही खरेदी केल्यास गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन मोफत

Samsung Fab Grab Fest Offers: इतर इ-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सॅमसंगनेही जबरदस्त सेलची घोषणा केली आहे. आजपासून हा सेल सुरू होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2023, 06:00 PM IST
सॅमसंगचा जबरदस्त सेल, टीव्ही खरेदी केल्यास गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन मोफत title=
Samsung Fab Grab Fest Offers Get Galaxy S23 Ultra smartphone with 98 inch Neo QLED

Samsung Fab Grab Fest Offers : भारतात सणांना सुरूवात होताच विविध कंपन्यानी सेलची घोषणा केली आहे. सॅमसंग इंडियाने अलीकडेच फॅब ग्रॅब फेस्टची घोषणा केली आहे. सेल सुरू झाला असून या दरम्यान अमेक स्मार्टफोन्सवर ऑफर्स आणि कॅशबॅक देण्यात येत आहेत. Samsung Galaxy स्मार्टफोन्स, टॅबलेट, एक्ससरीज, वेअरेबल्स, टीव्हीसह अन्य उपकरणांवर तुम्ही घसघशीत सूट मिळणार आहे. अगदी कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकणार आहात. 

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट Samsung.com, Samsung एक्सक्लूसिव स्टोर्स और सॅमसंग शॉप अॅपवर या सेलअतर्गंत तुम्ही खरेदी करु शकणार आहात. हा सेल 5 ऑक्टोबरपासूनच सुरू झाला असून किती दिवस असणार आहे याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. या सेलचे एक वैशिष्ट्य म्हणजे टीव्ही खरेदी केल्यानंतर प्रिमियम स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. 

सॅमसंग प्रोडक्ट्सवर मिळेल डिस्काउंट

Samsung Galaxy Z सीरीज, S सीरीज, M सीरीज आणि F सीरीज स्मार्टफोन्स खरेदी केल्यास त्यावर 45 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल. त्याचबरोबर जर तुम्ही गॅलेक्सी टॅबलेट, वॉच आणि इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात तर त्यावर 41 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. या व्यतिरिक्त Neo QLED, QLED, OLED, 4K UHD TVs  आणि फ्रीस्टाइल प्रोजेक्टरच्या काही निवडक मॉडल्सवर 54 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल. जर तुम्ही घरासाठी फ्रीज, एसी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर काही निवडक मॉडेल्सवर देखील तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल.

गॅलेक्सी Z सीरीज, S सीरीज आणि A सीरीज स्मार्टफोन्सच्या काही निवडक मॉडल्सवर बायबॅक दिला जाणार आहे. त्याचबरोबर 70 टक्क्यांपर्यंत रीसेल व्हॅल्यूदेखील दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काही जास्त सामान खरेदी करणार असाल तर 5 टक्के अतिरिक्त डिस्काउंट दिले जाणार आहे. तसंच, जुना फोन एक्सचेंज केल्यास जास्त व्हॅल्यूदेखील मिळणार आहे. बँक डिस्काउंटदेखील मिळणार आहे. ICICI आणि HDFC कार्डवर 20 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे. 

टीव्हीवर फोन फ्री

ग्राहक 98 इंचाचा QLED आणि Neo QLED TV मॉडेल खरेदी करु इच्छित असतील तर त्यांना Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन मोफत दिला जाणार आहे. तर, काही निवडक OLED, QLED आणि UHD TV मॉडल्स खरेदी केल्यास मोफत सॅमसंग साउंडबार (Q900A किंवा S800B) फ्री मिळणार आहे. तर एकीकडे Neo QLED मॉडल खरेदी केल्यास 50 इंचाचा The Serif TV एकदम मोफत मिळणार आहे. तर, या संधीचा आत्ताच फायदा घ्या अन् भरघोस डिस्काउंट मिळवा.