तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? 'या' सोप्या ट्रिक्स करुन बघा!

Laptop Battery Drain Issues : ऑफीसची कामे असो किंवा कॉलजची कामे यासाठी लॅपटॉप ( Laptop Battery) अत्यंत गरजेचा आहे. मात्र तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही या टिप्स फॉलो करुन लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढवू शकता. 

Updated: Jun 9, 2023, 01:03 PM IST
तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? 'या' सोप्या ट्रिक्स करुन बघा!  title=
Laptop Battery Drain Issues

 Laptop Battery Drain Issues News In Marathi : स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप ( Laptop Battery) हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. कॉलेजच्या प्रोजेक्टपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत या सर्व कामांसाठी लॅपटॉप महत्त्वाचा झाला आहे. सध्या संगणकाच्या तुलनेत लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे लॅपटॉप कुठेही नेणे सहज शक्य आहे. 

लॅपटॉपमुळे कॅफेमध्ये बसूनही तुम्ही ऑफिसचे काम सहज पूर्ण करू शकता. विशेषतः लॉकडाऊननंतर लॅपटॉपचा ( Laptop Battery) वापर जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. पण, कधी महत्त्वाचे काम सुरु असते अशावेळीच नेमकी लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते. पूर्ण बॅटरी चार्ज करुनही लॅपटॉपची बॅटरी एक तास ही टिकत नाही. अशावेळी आपली सर्व महत्त्वाची कामे अडकून राहतात. मात्र आता असे काही झाल्यास काळजी करण्याची गरज नाही... तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या लॅपटॉपची बॅटरीची लाईफ वाढेल. जाणून घ्या सोप्या टिप्स... 

बॅटरी सेव्हरचा करा वापर 

लॅपटॉपवर काम करताना बॅटरी सेव्हर वापरल्याने तुमच्या डिव्हाइसमधील काही गोष्टी तात्पुरत्या बंद होतील आणि त्यामुळे पॉवरची बचत होईल. यामुळे ऑटोमेटिर ईमेल, कॅलेंडर सिंकिंग, लाइव्ह अपडेट व इतर अॅप्स बॅकग्राउंडमध्ये काम करत नाही. बॅटरी सेव्हर वैशिष्ट्य वापरण्यासाठी, स्टार्टरवर क्लिक करा आणि सेटिंग्जवर जा. येथे पॉवर आणि बॅटरीचा पर्याय दिसेल. येथून तुम्ही पॉवर सेव्हर मोड चालू करू शकता.  

अॅक्टिव्ह परफॉर्मेंससाठी कमी करा ड्यूरेशन

बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी स्क्रीनचा ड्यूरेशनकमी करणे आवश्यक आहे. लॅपटॉपची बॅटरी अधिक काळ टिकण्यासाठी खूपच कमी असेल. यामुळे स्क्रीन टाइम खूप कमी होतो. यासाठी तुम्हाला स्टार्टमध्ये जाऊन सेटिंग्जवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सिस्टमवर जाऊन पॉवर आणि बॅटरी पर्याय निवडा. त्यानंतर सिस्टममध्ये जाऊन पॉवर आणि बॅटरीचा पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीन व स्लीपच्या पर्यायावकर क्लिक करा. तसेच ऑन बॅचरी पॉवरसाठी turn off my screen हा पर्याय निवडा. यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढेल. 

लॅपटॉपचा ब्राइटनेस कमी करा

स्मार्टफोन असो किंवा लॅपटॉप, तुमच्या डिव्हाइसची ब्राइटनेस जास्त असेल तर बॅटरी लवकर संपते. बर्‍याचदा तुम्ही ब्राइटनेस जास्त ठेवता कारण स्क्रीनवरील कंटेंट स्पष्टपणे दिसतो, फक्त यामुळे बॅटरी लवकर संपते. ब्राइटनेस लेव्हल जितकी कमी होईल तितकी तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढेल. डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम स्टार्टर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. आता सिस्टम वर क्लिक करा आणि डिस्प्ले वर जा. येथे तुम्हाला ब्राइटनेसचा पर्याय मिळेल. काही लॅपटॉपमध्ये, ब्राइटनेस कमी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट देखील उपलब्ध आहे.

स्क्रीन रिफ्रेश रेट कमी करा

स्मार्टफोनप्रमाणेच हाय रिफ्रेश रेटमुळे तुम्हाला लॅपटॉप वापरताना तुम्हाला उत्कृष्ट कामगिरी मिळते. लॅपटॉप वापरताना कोणतीही अडचण येत नाही. मल्टीटास्किंग देखील सहज करता येते. परंतु, यामुळे डिव्हाइसची बॅटरी लवकर संपते. तुम्ही लॅपटॉपचा रिफ्रेश दर देखील कमी करू शकता. स्क्रीन रिफ्रेश दर कमी करण्यासाठी सर्वात स्टार्टवर क्लिक करा. त्यानंतर Settings मध्ये जाऊन System वर क्लिक करा. येथे तुम्हाला डिस्प्लेचा पर्याय दिसेल. येथून तुम्ही रिफ्रेश दर कमी करू शकता.

अॅप्ससाटी कस्टम ग्राफिक्सचा पर्याय निवडा

प्रथम स्टार्टर जा. पुढे Settings वर क्लिक करा. त्यानंतर सिस्टमवर जाण्यासाठी डिस्प्लेअरवर क्लिक करा. येथे तुम्हाला ग्राफिक्सचा पर्याय दिसेल. आता कस्टम पर्यायांतर्गत अॅपचा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला पॉवर सेव्हिंगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढण्यास मदत होईल. तसेच, बॅकग्राउंड अॅप्लिकेशन देखील बंद ठेवावेत. ब्लूटूथ आणि वाय-फाय देखील सतत सुरु ठेवू नये.