तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर  WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Sep 27, 2023, 07:08 PM IST
तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद title=
संग्रहित फोटो

WhatsApp Support Discontinue: इंटरनेटच्या युगात व्हॉट्सॲप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. व्हॉट्सॲप हे भारतातलं सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. सध्याच्या काळात जवळपास सर्वच कामांसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. घरातील महत्त्वाच्या कामांपासून ते ऑफिसच्या कामासह अनेक आवश्यक कामं या ॲपच्या माध्यमातून केली जातात.  घरबसल्या कोणत्याही व्यक्तीला ऑडीओ, व्हिडीओ, फोटोज, डॉक्युमेंट व इतर तपशील शेअर करू शकतो.

त्यामुळे व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण काही स्मार्टफोनमधून व्हॉट्स्ॲप बंद होणार आहे. व्हॉट्सॲप कंपनीच्या अधिकृत साईटवर FAQ सेक्शनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्टबाबत माहिती देण्यात आली आहे. यात देण्या आलेल्या माहितीनुसार हे ॲप अँड्रॉईड व्हर्जन 4.1 आणि त्यावरच्या ऑपरेंटिंग सिस्टमला सपोर्ट करतं. अॅपल फोनमध्ये iOS 12 आणि त्यावरच्या व्हर्जनमध्ये व्हॉट्सॲप काम करतं. 

या तारखेपासून बंद
व्हॉट्सॲपच्या अधिकृत साईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबर 2023 नंतर फक्त अँड्राईड व्हर्जन 5.0 आणि त्यावरच्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप सुविधा सुरु असेल. 

असं चेक करा फोनचं व्हर्जन
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचं व्हर्जन तपासायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर About Phone मध्ये जा. इथं तुम्हाला सॉफ्टवेअर ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. इथं तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचं व्हर्जन कळू शकतं. 24 ऑक्टोबरनंतर तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप बंद झालं तर समजा तुमचा मोबाईल बदलण्याची वेळ आली आहे. 

व्हॉट्सॲप चॅनेलची सुविधा
व्हॉट्सॲपतर्फे युजर्ससाठी नवनवे फिचर्स आणले जातात. असं एक व्हॉट्सॲप चॅनेल (WhatsApp Channel) नावाचं भन्नाट फिचर्स आणण्यात आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येणं सोप होणार आहे. भारतात या फिचर्सला चांगला प्रतिसाद मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय देवरकौंडा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी व्हॉट्सॲप चॅनेल सुरु केलं असून काही दिवसातच लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत. मेटा कंपनीने युजर्सची आवड-निवड लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप चॅनल फिचरची सुरुवात केली आहे. युजर्स ज्या व्यक्तिला फॉलो करतो, त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. यात राजकीय नेते, बॉलिवूड, वृत्तवाहिन्या यांचे व्हॉट्सअॅप चॅनलचा समावेश असून त्यांना फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.