xiaomi कंपनीच्या 'या' मोबाईलच्या किंमतीत घट

या स्मार्टफोनला या श्रेणीतला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन मानले जाते.

Updated: Dec 11, 2018, 05:44 PM IST
xiaomi कंपनीच्या 'या' मोबाईलच्या किंमतीत घट title=

मुंबई : xiaomi ने आपल्या एका विशेष स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन xiaomi Poco- F1 आहे. कंपनीने याआधी सुद्धा अनेकदा स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने नुकताच Poco- F1 स्मार्टफोनच्या सर्व वेरिअंटच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली.

६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम असलेल्या वेरिअंटच्या स्मार्टफोनची किंमत १००० रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. कमी दरांनुसार हा स्मार्टफोन १९ हजार ९९९ रुपयाला मिळेल. १२ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम असलेल्या वेरिअंटची किंमत कमी होऊन २२ हजार ९९९ रुपये तर २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम असलेल्या वेरिअंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये इतकी असेल. फायनान्शियल एक्स्प्रेसनुसार, हे स्मार्टफोन नव्या किंमतीनुसार Mi.com आणि Mi होम स्टोअर आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.

poco F1 चे फिचर

या स्मार्टफोनला या श्रेणीतला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन मानले जाते. या सेगमेंटमध्ये One Plus 6 T, Pixel 3 आणि इतर हॅण्डसेट आहेत.  Xiaomi Poco F1 या स्मार्टफोनचा डिस्पले ६.१८ इंच इतका आहे. यात १२ मेगापिक्सल कॅमेरा तर ५ मेगापिक्सल इतका ड्युअल रिअर कॅमेरा आहे. फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा २० मेगापिक्सल इतका आहे. सेल्फी कॅमेरा एलइडी फ्लॅशसोबत आहे. या मोबाईलमध्ये फेस रीडर फिचर आहे. या स्मार्टफोनची बॅटरी पॉवर ४००० एमएएच इतकी आहे.