मोठी बातमी! कुणी नोकरी देता का नोकरी? Twitter, Meta नंतर आता 'या' कंपनीमध्येही 10 हजार नोकरकपात

Twitter, Meta अन् Microsoft या कंपन्याकडून कर्मचाऱ्यांच्या नोकरी गदा आणली आहे.

Updated: Nov 15, 2022, 09:25 AM IST
मोठी बातमी! कुणी नोकरी देता का नोकरी? Twitter, Meta नंतर आता 'या' कंपनीमध्येही 10 हजार नोकरकपात title=

Amazon Lay Off : व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना Twitter, Meta अन् Microsoft या कंपन्याकडून कर्मचाऱ्यांच्या नोकरी गदा आणली आहे. मात्र आता रिटेल कंपनीमध्ये टॉप 10 मध्ये असलेली अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनीकडूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. 

गेल्या काही तिमाहींपासून कंपनीच्या तोट्यात वाढ होत असल्याने खर्चकपातीबरोबरच मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची शक्यता व्यक्त होत आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. दरम्यान ऑनलाइन विक्री (online shopping) कंपनी असणाऱ्या अ‍ॅमेझॉनने (Amazon) 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यास कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल.

वाचा : जय श्रीराम! 'या' मुस्लीम देशात रामाचे असंख्य भक्त  

जगभरात अ‍ॅमेझॉनचे 16 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारीसंख्येच्या 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. या आठवड्यात नोकरदारांना काढून टाकले जाऊ शकते. कर्मचारी कपात झाल्यास यामध्ये डिव्हाइस ग्रुपसह रिटेल आणि एचआर विभागाचा समावेश आहे. यामध्ये अॅलेक्सा वॉइस असिस्टंटची जबाबदारी असणाऱ्या कर्चमाऱ्यांचाही समावेश असू शकतो.

अ‍ॅमेझॉनने तोट्यात असणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. ई-कॉमर्स (e commerce) कंपनीला सणांच्या दिवसातही मोठा तोटा सहन करावा लागला होता. एरव्ही नफा होणाऱ्या सणांमध्येही तोटा झाल्यानंतर काही आठवड्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे. किंमती वाढत असल्याने ग्राहक आणि व्यावसिकांकडे खर्चाकरता जास्त पैसै नसल्यानेच तोटा झाल्याचं कपंनीचं म्हणणं आहे.