"Free मध्ये मिळतय Twitter Blue Tick..." तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान!

Twitter Blue Tick Scam: Twitter Blue Tick साठी वेरिफाइड यूजर्सला आता पैसे मोजावे लागणार आहेत. याचदरम्यान ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही म्हटले आहे की, ब्लू टिक कोणालाही मिळू शकतं.. याचाच फायदा घेत एक नवा घोटाळा समोर आला असून तो अत्यंत धोकादायक आहे.

Updated: Nov 2, 2022, 12:31 PM IST
"Free मध्ये मिळतय Twitter Blue Tick..." तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान!   title=

Twitter Blue Tick : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे 'ब्लू टिक' (Blue Tick) सबस्क्रिप्शनसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग (Microblogging) प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवर 'ब्लू टिक’साठी लागणारे शुल्क जाहीर केले आहे.

इलॉन मस्क यांच्या घोषणेनुसार, ट्विटरवरील 'ब्लू टिक'ची किंमत प्रति महिना 8 डॉलर्स (सुमारे 660 रुपये) असेल. मात्र याचाच फायदा घेत एक नवीन घोटाळा समोर आला आहे. ज्यामध्ये ईमेलद्वारे Twitter Blue Tick Free मध्ये मिळेल असा ईमेल पाठवला जात आहे. 

काय आहे नवीन घोटाळा?

ट्विटरवर पेड व्हेरिफिकेशन (Paid Verification)  टाळण्यासाठी ट्विटर युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढत आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत SCAM करण्यात येत आहे. TechCrunch च्या रिपोर्टनुसार, तुम्हाला नवीन स्कॅममध्ये ईमेल मिळतो. ज्यामध्ये तुम्हाला ‘Don’t lose your free verified status’ (म्हणजे तुम्ही तुमची व्हेरिफाईड ब्लू टिक मोफत मिळवण्यापासून गमावू नका). असाप्रकारे मेल करून Twitter Users ची फसवणूक करत आहेत. तसेच फसवणूक करणारे तुम्हाला Unsafe site वरून ईमेलची लिंक (email link) देखील पाठवतात.
लोकांची अशी फसवणूक होत आहे. 

वाचा : Whatsapp यूजर्सना मिळणार Twitter चे फीचर, चॅटिंगचा अनुभव वाढणार दुप्पट-तिप्पट

ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व / जाणते लोक असाल तर तुम्ही फक्त तुमच्या प्रसिद्धीचा पुरावा द्या आणि ट्विटरवर ब्लू सबस्क्रिप्शन मोफत मिळवा. यासाठी स्कॅमर तुमच्याकडून वैयक्तिक माहिती घेतात आणि तुम्ही याचे बळी पडतात. इतर भाषांमध्ये याला फिशिंग असेही म्हणतात. जर तुम्ही हुशार वापरकर्ता असाल तर तुम्ही या घोटाळ्यातून वाचाल, अन्यथा तुम्ही या घोटाळ्याच्या विळख्यात पडू शकता.

 घोटाळे कसे टाळायचे?

इंटरनेटवर फक्त फिशिंगच नाही तर अनेक प्रकारचे स्कॅम चालतात.  हे टाळण्यासाठी तुम्हाला नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषत: जेव्हा कोणी तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती विचारत असेल. तुम्ही ईमेलद्वारे कोणत्याही साइटवर जात असाल, तर ती वेबसाइट सुरक्षित असेल याची विशेष काळजी घ्या.