VI चे 5 स्टार धमाकेदार प्लान्स, जबरदस्त वॅलिडीटीसह बरंच काही

 टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) नुकतंच 5 नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत.  

Updated: May 1, 2022, 06:11 PM IST
VI चे  5 स्टार धमाकेदार प्लान्स, जबरदस्त वॅलिडीटीसह बरंच काही  title=

मुंबई :  टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) नुकतंच 5 नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. या 5 पैकी 2 प्लान्स हे डेटा व्हाउचर आहेत, तर उर्वरित 3 रिचार्ज प्लान आहेत.  यामध्ये युझर्सना अनेक फायदे मिळणार आहेत.  डेटा व्हाउचर रुपये 29 आणि 39 रुपयांचे आहेत. तर बाकीचे 3 प्लॅन रुपये 98, 195 आणि 319 रुपयांचे आहेत. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (vi vodafone idea launches prepaid plans worth Rs 98 Rs 195 Rs 319 know details)

व्होडाफोन आयडिया 98 रुपयांचा प्लान

Vodafone Idea च्या 98 रुपयांच्या प्लानची 15 दिवसांची वॅलिडिटी आहे.  या प्लॅनमध्ये 200 MB इंटरनेट मिळणार आहे. सोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड  व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. 

195 रुपयांचा प्लान 

Vi च्या या प्लॅनमध्ये  2GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळणार आहेत.  या प्लानची वॅलिडिट 31 दिवसांची आहे.  यामध्ये Vi Movies & TV अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. 

319 रुपयांचा प्लॅन

319 रुपयांच्या प्लानची वॅलिडिटी 31 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 2 जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये 195 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे Vi Movies & TV अॅपचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.  हा प्लान कंपनीच्या विशेष Binge All Night, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि दरमहा 2GB अतिरिक्त बॅकअप डेटा लाभांसह येतो.