जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन आखला आहे, मात्र हा प्लॅन सध्या तरी नव्या ग्राहकांसाठी आहे. 

Updated: Jul 24, 2017, 07:50 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन title=

मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचा 'मेगा' प्लॅन आखला आहे, मात्र हा प्लॅन सध्या तरी नव्या ग्राहकांसाठी आहे.  एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही नव्या ग्राहकांसाठी २४४ रुपयांचा हा विशेष प्लॅन आणला आहे. 

हा प्लॅनची मुदत ७० दिवसांची असणार आहे. या प्लॅननुसार  ७०  दिवसांसाठी ७० जीबी डेटा मिळेल. म्हणजेच प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा, पहिल्या रिचार्जवरच ही ऑफर मिळणार आहे.

दुसऱ्यांदा रिचार्ज केल्यास या ऑफरची व्हॅलिडिटी केवळ ३५ दिवसांसाठी असेल. मात्र ७० जीबी एवढाच डेटा दिला जाईल, आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे.

यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज थ्रीजी/फोरजी डेटा मिळेल. व्होडाफोनने या शिवाय ३४६ रुपयांची ऑफरही आणली आहे. ज्याची व्हॅलिडिटी ५६ दिवसांची असेल. 

व्हॉईस कॉलिंगसाठी मर्यादा ठेवण्यात आली आहे. एका दिवसात ३०० मिनिटे वापरता येतील, तर आठवड्यात १२०० मिनिटांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर व्होडाफोन अॅपवरुन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅकही मिळेल.

कोणत्याही ऑफरचा घेताना आधी आपल्या नंबरवरील ऑफर पाहणे आवश्यक आहे, कारण व्होडाफोन काही निवडक नंबर्सनाच ऑफर देत असल्याचं सांगण्यात येतं.