२१ रुपयांत ही कंपनी देत आहे अनलिमिटेड इंटरनेट डेटा प्लॅन!

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्या नवनवे आकर्षक प्लॅन्स सादर करत आहेत.

Updated: Mar 16, 2018, 12:30 PM IST
२१ रुपयांत ही कंपनी देत आहे अनलिमिटेड इंटरनेट डेटा प्लॅन! title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्या नवनवे आकर्षक प्लॅन्स सादर करत आहेत. आता वोडाफोनने २१ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. कंपनी हा प्लॅन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी घेऊन आली आहे.

२१ रुपयांत युजर्संना काय मिळणार

वोडाफोनच्या या पॅकमध्ये युजर्सला 3G/4G इंटरनेट डेटा मिळत आहे. या प्लॅनची व्हलिडिटी एक दिवसाची आहे. या प्लनमध्ये युजर्संना एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल. मात्र यात कोणताही टॉकटाईम मिळणार नाही.
इतर टेलिकॉम कंपन्यांच्या कमी किंमतीच्या ऑफर्स...

एअरटेलचा ५ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची व्हलिडिटी ७ दिवसांची असून यात 4GB 3G/4G डेटा मिळेल. यासाठी तुमच्याकडे सिम 4G अपग्रेड असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.

एअरटेलचा ८ रुपयांचा प्लॅन

यात कॉल रेट्स स्वस्त आहेत. यात युजर्संना लोकल-एसटीडी कॉल्स ३० पैसे प्रति मिनीटांच्या दराने मिळतील. याची व्हलिडीटी ५६ दिवसांची आहे.

एअरसेलचा १४ रुपयांचा प्लॅन

२ दिवसांच्या व्हलिडीटीत यात १०० एमबी डेटा मिळेल. यात फ्री व्हाईस कॉलिंग उपलब्ध नाही.

आयडीयाचा १५ रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन ३० दिवसांच्या व्हलिडीटीसहीत आहे. यात युजर्संना १०० एमबी डेटा मिळेल. यात सर्व कॉल रेट्स कमी होऊन १.५ पैसे झाले आहेत.