३० जूनला या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

तुम्ही देखील जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्याकडे खाली दिलेले मोबाईल व्हर्जन असतील तर तुमचं व्हॉट्सअॅप ३० जूननंतर बंद होणार आहे. ब्लॅकबेरी (ब्लॅकबेरी 10), नोकिया S40, नोकिया Symbian S60, Android 2.1, Android 2.2, विंडोज फोन 7.1, आयफोन 3GS / iOS 6 या फोनमधील WhatsApp बंद होणार आहेत.

Updated: Jun 11, 2017, 12:22 PM IST
३० जूनला या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप होणार बंद title=

मुंबई : तुम्ही देखील जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्याकडे खाली दिलेले मोबाईल व्हर्जन असतील तर तुमचं व्हॉट्सअॅप ३० जूननंतर बंद होणार आहे. ब्लॅकबेरी (ब्लॅकबेरी 10), नोकिया S40, नोकिया Symbian S60, Android 2.1, Android 2.2, विंडोज फोन 7.1, आयफोन 3GS / iOS 6 या फोनमधील WhatsApp बंद होणार आहेत.

व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे की, या ऑपरेटींग सिस्टमवरील त्यांचं अॅप बंद केलं जाणार आहे. कंपनीने याआधी फार पूर्वी जाहीर केले होते पण त्याला खूप विरोध झाला म्हणून कंपनीने काही काळ वाढवला. पण आता ३० जूनला या मोबाईल ऑपरेटींग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद केले जाणार आहेत.

व्हॉट्सअॅपने त्यांचं अॅप वापरण्यासाठी मोबाईलच्या ऑपरेटींग सिस्टमला अपडेट करण्यासाठी सांगितले आहे. इतर ऑपरेटींग सिस्टमला मात्र व्हॉट्सअॅप सपोर्ट करत राहणार आहे.