फक्त 499 रुपयांत खरेदी करा Redmi 5A

मोबाईल निर्माता कंपनी एमआय (Mi) भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व आणि व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 7, 2017, 07:41 PM IST
फक्त 499 रुपयांत खरेदी करा Redmi 5A
File Photo

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी एमआय (Mi) भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व आणि व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.

फोनची बॅटरी ८ दिवस चालणार 

काही दिवसांपूर्वी कंपनीने Xiaomi Redmi 5A लॉन्च केला होता. या फोनसंदर्भात कंपनीने दावा केला आहे की, एकदा हा फोन पूर्णपणे चार्ज केला तर याची बॅटरी ८ दिवस चालते. लॉन्चिंगपासूनच युजर्स हा फोन घेण्यासाठी धडपड करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता कंपनीने हा फोन ऑफिशियल वेबसाईटसोबतच फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

देशाचा स्मार्टफोन

कंपनीने हा फोन 'देशाचा स्मार्टफोन' या टॅगलाईनसोबत लॉन्च केला होता. गुरुवारी या फोनचा पहिला दिवस होता. Redmi 5A हा फोन 2GB/16 GB या दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध असून 5,999 रुपयांत लॉन्च केला. 

कंपनीने लॉन्चिंगवेळी या फोनवर कॅशबॅक ऑफरनुसार 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 16 GB ची इंटरनल मेमरी असलेला फोन 4,999 रुपयांत लॉन्च केला होता. 

ही आहे खास ऑफर 

फ्लिपकार्ट (flipkart.com)वर स्पेशल ऑफरनुसार Redmi 5A फोनवर 4500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. म्हणजेच तुम्ही कुठलाही जुना फोन देत Redmi 5A खरेदी केल्यास तुम्हाला सूट मिळणार आहे. जर तुम्हाला जुन्या फोनवर 100% एक्सचेंज ऑफर मिळाली तर तुम्हाला Redmi 5A हा फोन केवळ 499 रुपयांत मिळणार आहे. तर, या फोनच्या 3GB/ 32GB इंटरनल मेमरी असलेल्या वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे.

फोनमध्ये जिओ कार्ड वापरण्याचा फायदा 

या फोनमध्ये जिओ कार्ड वापरल्यास केवळ 199 रुपयांत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर 100 रुपयांच्या 10 वाऊचर युजरच्या मायजिओ अॅप अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जातील. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी मायजिओ अॅपवरुन 309 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पॅकवर 201 किंवा त्यापेक्षा अधिकचे अॅड-ऑनवरच हे काम करेल.

xiaomi redmi 5a, redmi 5a sale, redmi 5a in 499, redmi 5a, redmi 5a on flipkart, discount on redmi 5a

डिस्प्ले

Redmi 5A अँड्रॉईड नूगा आधारित मियूआय 9 वर चालतो. फोनमध्ये 720x1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेली 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा पिक्सल डेनसिटी 296 पीपीआय आहे. फोनमध्ये क्वाड-कोअर क्वालकॉम 425 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.4 गिगाहर्ट्जवर चालतो. 

रॅम आणि मेमरी

शाओमी Redmi 5A 2 GB आणि 3 GB रॅमसोबत उपलब्ध आहे. 2 GB रॅम असलेल्या फोनमध्ये 16 GB इंटरनल मेमरी तर 3 GB रॅम असलेल्या फोनमध्ये 32 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामुळे मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.  या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याचा स्टँडबाय टाईम 8 दिवस आणि 7 तास व्हिडिओ प्लेबॅक टाईम देण्याचा दावा करण्यात आला आहे.

xiaomi redmi 5a, redmi 5a sale, redmi 5a in 499, redmi 5a, redmi 5a on flipkart, discount on redmi 5a

कॅमेरा 

या फोनमध्ये एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफसोबत 13 MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटच्या शौकीनांसाठी एफ/2.0 सोबत 5 MP कॅमेरा देण्यात आला आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close