वर्षभरात भारतीयांकडून इंस्टाग्रामवर 'या' इमोजीचा सर्वाधिक वापर

पाहा इंस्टाग्रामवर सर्वाधिक चाललेल्या गोष्टी   

वर्षभरात भारतीयांकडून इंस्टाग्रामवर 'या' इमोजीचा सर्वाधिक वापर  title=

मुंबई : 2018 हे वर्ष सरत आलं... 15 दिवसांनी आपण नव्या वर्षात म्हणजे 2019 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. हे वर्ष सरताना या वर्षभरात सोशल मीडियावर कोणकोणत्या गोष्टीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं याचा आढावा आपण आज घेणार आहोत. 

सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर 2018 मध्ये लैंगिक शोषणाविरोधात महिलांच्या बाजूने आवाज उठवण्यात आला. मीटू अभियानात सर्वाधिक समर्थन मिळालं. जगभरात 15 लाखाहून अधिक #metoo हा हॅशटॅग पोस्ट करण्यात आला. 

#metoo पाठोपाठ दुसऱ्या क्रमांरावर #timesup हे अभियान राहिलं. या अभियानाला जवळपास 6 लाखवेळा पोस्ट करण्यात आलं. 

एवढंच काय तर वर्षभरात भारतीयांनी इंस्टाग्रामवर प्रेमाचे आणि आनंदाचे पोस्ट शेअर केले. हॅशटॅगच्या कॅटगिरीत भारतीयांनी #love या हॅशटॅगचा सर्वाधिक वापर केला. तसेच हार्टचं स्टिकर सर्वाधिक वेळा पोस्ट करण्यात आलं. 

तसेच देशात सर्वाधिक जास्त युझर्सकडून विराट आणि अनुष्काची पोस्ट लाइक करण्यात आली. विराटच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोला 36 लाखाहून अधिक लाइट मिळाले. तसेच दुसरा फोटो देखील विरूष्काचा आहे. या फोटोला 28 लाख लाइक्स मिळाले आहे. फक्त हा फोटो अनुष्काच्या अकाऊंटवरून करण्यात आला. तिसरा लोकप्रिय फोटो हो धोनीचा राहिला आहे. 

इंस्टाग्रामबद्दल बोलायचं झालं तर सर्वाधिक वेळी #metoo शी संबंधीत विषयांवर चर्चा झाली. 2018 मध्ये टॉप ट्रेंडमध्ये विरूष्का म्हणजे विराट आणि अनुष्काची जास्त चर्चा झाली. त्यांच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळाली. जगभरातील ट्रेंडबद्दल बोलायचं झालं तर फेस फिल्टरच्या रुपाच हार्ट डोळ्यांचा वापर सर्वाधिक करण्यात आला. या इमोजीला 140 करोड वेळा वापरण्यात आलं. 

या गोष्टी जाणून घ्या 

जगातील सर्वाधिक आनंद देणारी जागा - डिझनीलँड, टोकियो

टॉप कम्युनिटी ट्रेंड - ASMR (मानसिक आराम देणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ) 

वायरल डान्स चॅलेंज - #inmyfeelingschallenge 

भारतात सर्वाधिक पोस्ट या शहरांमधून - मुंबई, दिल्ली, बंगलुरू

भारतातील टॉप 3 हॅशटॅग - #love #instagood #fashion 

ट्रेंड 

जगभरात

भारतात

स्टिकर/इमोजी

हृदय (Arata)

हृदय

फेस फिल्टर

हार्ट आइज (140 करोड वेळा)

हार्ट आइज

हॅशटॅग

#Love

#Love