बॅंकेत न जाता खातं आधारसोबत करा लिंक

आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. सरकारने बॅंक खात्यांना आधारसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.

Updated: Nov 6, 2017, 01:29 PM IST
बॅंकेत न जाता खातं आधारसोबत करा लिंक title=

नवी दिल्ली : आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. सरकारने बॅंक खात्यांना आधारसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.

अशात जर तुम्ही तुमचं खातं आधारशी लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर हे काम करा. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला बॅंक शाखेत जाण्याचीही गरज नाहीये. घरी बसल्या तुम्ही आधार बॅंक खात्यासोबत लिंक करू शकता. 

कसे कराल बॅंक खाते आधारसोबत लिंक?

पहिला पर्याय -  बॅंक खात्याला आधारशी जोडण्याची पहिला पर्याय हा आहे की, तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन आधार नंबर आणि बॅंक खात्याची माहिती बॅंक अधिका-यांना द्या. बॅंक अधिकारी खातं आधारशी लिंक करून देईल. यासाठी तुम्हाला त्यांना आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि बॅं खात्याची माहिती द्यावी लागेल. 

दुसरा पर्याय -

इंटरनेट बॅंकिंग द्वारेही आधार लिंक केलं जाऊ शकतं. इंटरनेट बॅंकिंग लॉगिन केल्यानंतर लिंक यूअर आधार नंबर हा पर्याय सिलेक्ट करा. या पर्यायावर क्लिक केल्यास आधार रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल. यात ट्रान्झॅक्शन अकाऊंट, मोबाईल क्रमांक, आधार नंबर आणि कन्फर्म आधार नंबर भरा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. रेफरन्स नंबर नोट करून घ्या. तुमचं आधार खात्याशी लिंक होईल. आधार लिंक झाल्याची माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारे दिली जाईल. 

एटीएमवरूनही आधार लिंक -

तिसरा पर्याय -

बॅंकांनी खात्याशी आधार लिंक करण्यासाठी आणखी एक पर्याय दिला आहे. खातेधारक आपले खाते असलेल्या बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊनही आधार लिंक केलं जाऊ शकतं. एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून पिन नंबर टाका. विंडोवरील पर्यायांमधील सर्व्हिस-रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर आधार रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. आपलं खातं सेव्हिंग आहे की, करंट हे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. सबमिट केल्यावर बॅंक खातं आधारसोबत लिंक होईल.