दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडेंची मोठी घोषणा

शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठीच ही प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

Updated: Jul 9, 2018, 07:16 PM IST
दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडेंची मोठी घोषणा title=

नागपूर: आगामी दोन महिन्यांत राज्यातील शिक्षकांची १८ हजार रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा सोमवारी राज्य सरकारकडून करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. त्यानुसार या जागा ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. तसेच या भरतीसाठी आरक्षणाचे निकष लागू असतील. शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठीच ही प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले. या जागा आरक्षणाच्या निकषावर भरणार असून त्यात खेळाडूंच्या आरक्षणाचाही समावेश असणार आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरती बंद आहे. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी हा मोठा दिलासा आहे.